Bigg Boss 14 : पवित्रा पुनियाने माझ्यापासून लपवली लग्नाची गोष्ट...! एक्स-बॉयफ्रेन्डचा दावा
By रूपाली मुधोळकर | Updated: October 5, 2020 12:57 IST2020-10-05T12:42:31+5:302020-10-05T12:57:06+5:30
जाणून घ्या कोण आहे पवित्रा पुनिया?

‘बिग बॉस’चा 14 वा सीझन होऊन जेमतेम एक दिवस झाला असताना घरात वादाची ठिणगी पडलीये. शिवाय बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांच्या पर्सनल लाईफशी संबंधित एक ना अनेक गोष्टींचीही चर्चा सुरू झालीये. स्पर्धक पवित्रा पुनिया ही अशाच पर्सनल लाईफ चर्चांना सध्या ऊत आला आहे.
पवित्रा पुनियाने बिग बॉसच्या घरात धडाकेबाज एन्ट्री घेतली. हीच पवित्रा आधी बिग बॉस 13 चा स्पर्धक राहिलेला पारस छाब्राला डेट करत होती. कालांतराने दोघांचे ब्रेकअप झाले होते. पण आता बिग बॉस 14 च्या निमित्ताने या दोघांच्या रिलेशनशिपबद्दलच्या अनेक गोष्टी चव्हाट्यावर येत आहेत.
पारसला डेट करणे माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती, असे पवित्राने म्हटले आहे. पारसने आता याचे उत्तर दिले आहे.
मला डेट करत असताना पवित्रा विवाहित होती. पवित्राच्या पतीने मला मॅसेज केला, त्यानंतर कुठे ती विवाहित असल्याचे मला कळले होते, असे पारसने ई-टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितला.
पारस म्हणाला, ती विवाहित असताना तिने माझ्यापासून लपवून ठेवले. तिच्या पतीने मला मॅसेज केला. आमचा घटस्फोट झालेला नाही. घटस्फोट झाल्यानंतर तुम्ही वाट्टेल ते करा, असे तिच्या पतीने मला म्हटले. एका विवाहित महिलेला मी डेट कसा करू शकत होतो आणि आता ती पारसला डेट करणे माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती, असे सांगतेय.
मी आणखी काही बोलू इच्छित नाही. वेळ आलीच तर मी बोलेन, असेही पारस म्हणाला.
बिग बॉसमध्ये एन्ट्री घेण्यापूर्वी पवित्राने पारसवर अनेक आरोप केले होते. त्याने मला बिग बॉसमध्ये जाऊ नकोस, असा सल्ला दिला होता.
पारसमध्ये थोडाही आत्मसन्मान असेल तर त्याने बिग बॉस 14 मध्ये येऊ नये आणि आलाच तर मला डिवचू नये. अन्यथा परिणाम वाईट होतील, असेही ती म्हणाली होती.
पवित्रा 2009 मध्ये सर्वप्रथम एमटीव्ही स्प्लिटविलामध्ये दिसली होती. यानंतर ‘ये है मोहब्बतें’ या मालिकेत तिने निधीची भूमिका साकारली होती.
प्रीतो, नागिन 3, कवच, डायन या मालिकेतही ती झळकली. विशेषत: तिने साकारलेल्या निगेटीव्ह भूमिका खूप लोकप्रिय झाल्या.
बालवीर रिटर्न्स या मालिकेत तिने साकारलेली तिमनासाची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती.