'भाबीजी घर पर हैं'मधील गोरी मेमने केला मालिकेला रामराम, तिच्या जागी लागू शकते शेफाली जरीवालाची वर्णी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2020 16:15 IST2020-08-21T16:15:39+5:302020-08-21T16:15:39+5:30

लोकप्रिय मालिका भाबीजी घर पर है मालिकेला फॅन फॉलोविंग खूप आहे.
अंगूरी भाभी शिवाय मालिकेत सौम्या टंडन साकारत असलेली भूमिका अनीता भाभीलादेखील चाहते खूप पसंती देत आहेत.
मात्र आता सौम्या टंडन हिने मालिका सोडली आहे. सौम्याने एका मुलाखतीत स्वतः या गोष्टीचा खुलासा केला आहे.
सौम्याने मालिका सोडल्याचे समजताच शेफाली जरीवाला गोरी मेम उर्फ अनीता भाभीच्या भूमिकेत दिसू शकते.
न्यूज 18च्या रिपोर्टनुसार, शेफालीने या वृत्ताचे खंडन केले आहे.
खरेतर बॉलिवूड लाइफशी बोलताना सौम्या टंडन म्हणाली की, शेफाली यापूर्वीच स्पष्ट केले की तिला या मालिकेसाठी विचारण्यात आलेले नाही. त्यावर मी काय बोलू शकते.
नुकतेच सौम्या टंडनने एका मुलाखतीत सांगितले होते की भाबीजी घर पर है मालिकेचे कॉन्ट्रॅक्ट वाढवणार नाही आहे जे 21 ऑगस्टला संपत आहे. शुक्रवारी ती शेवटचे शूट करणार आहे.