तशी चिंब बरसात, अन् जाळ काळजात..., श्रेया बुगडेचा साज घेई रसिकांच्या मनाचा ठाव

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2023 05:18 PM2023-10-14T17:18:15+5:302023-10-14T17:31:00+5:30

Shreya Bugde : 'चला हवा येऊ द्या' फेम अभिनेत्री श्रेया बुगडे हिचे लेटेस्ट फोटो चर्चेत आले आहेत.

छोट्या पडद्यावरील कॉमेडी रिएलिटी शोमधून अभिनेत्री श्रेया बुगडे हिने महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांची मनं जिंकली. तिचं अप्रतिम कॉमेडीच टायमिंग आणि कलाकारांची हुबेहूब नक्कल करण्याची कला यामुळे श्रेयाने महाराष्ट्राला खळखळून हसवलं.

श्रेया बुगडे गेल्या अनेक वर्षांपासून मराठी इंडस्ट्रीत काम करत आहे. पण तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता चला हवा येऊ द्या या कार्यक्रमामुळे मिळाली.

श्रेया बुगडे सोशल मीडियावर खूप सक्रीय असून ती या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते. तसेच फोटो देखील शेअर करत असते.

नुकतेच श्रेया बुगडेने व्हाईट रंगाच्या साडीवर पिंक रंगाच्या लाइन्स असणारी साडी परिधान केली आहे. यात ती खूपच सुंदर दिसते आहे.

तिने या फोटोशूटमध्ये एकापेक्षा एक हटके पोझ दिल्या आहेत. तिच्या या फोटोंनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

श्रेया बुगडेने हे फोटो शेअर करत लिहिले की, सानपाउली पैंजन, हाती फिरती काकन, तिचं हसन लाजन, गोंदी मनात गोंदन. तिच्या वाटंवर फुलं , कळी कमळाची खुलं, तिच्या वठाच्या कळीत, कसा जीव घालंमेलं. अशी तोऱ्यात निघाली, जनू विज पावसातं, तशी चिंब बरसात, अन् जाळ काळजात.

श्रेया बुगडेच्या या फोटोवर चाहते लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

चला हवा येऊ द्या या कार्यक्रमामुळे श्रेया बुगडेला प्रचंड लोकप्रियता मिळाली.

फू बाई फू या कार्यक्रमात देखील ती झळकली होती.