कुणाचं लव्ह मॅरेज मोडलं तर कुणाचे पतीवर आरोप; पहिलं लग्न मोडल्यानंतर 'या' मराठी अभिनेत्रींनी दुसऱ्यांदा थाटलाय संसार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2026 12:59 IST2026-02-16T12:12:04+5:302026-02-16T12:59:26+5:30
अर्ध्यावरती डाव मोडला पण...; पहिलं लग्न मोडल्यानंतर या मराठी अभिनेत्रींनी दुसऱ्यांदा थाटलाय संसार

'रात्रीस खेळ चाले'मध्ये शेवंताची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर लग्नाच्या बेडीत अडकली आहे. अपूर्वाने व्हॅलेंटाइन डेला अनुज गोवलकरसोबत नव्याने संसार थाटला आहे.

अपूर्वाचं हे दुसरं लग्न आहे. तिचं पहिलं लग्न २०१४ साली रोहन देशपांडेसोबत झालं होतं. त्याआधी काही वर्ष ते रिलेशनशिपमध्ये होते. मात्र काही वर्षांतच त्यांचा घटस्फोट झाला.

त्यानंतर अपूर्वा सिंगलच होती. मात्र आता तिने दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधत नव्याने आयुष्याला सुरुवात केली आहे.

अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत हिचं पहिलं लग्न २०१८ मध्ये अमेय निपाणकरसोबत झालं होतं. मात्र काही वर्षांतच ते वेगळे झाले. त्यानंतर तिने तेजस देसाईसोबत संसार थाटला आहे.

मेघा धाडे हिचंदेखील हे दुसरं लग्न आहे. पहिल्या नवऱ्यापासून तिला एक मुलगी आहे. मेघा धाडे आता आदित्य पावसकरसोबत सुखाने संसार करत आहे.

'संगीत देवबाभळी' फेम अभिनेत्री शुभांगी सदावर्ते हिचा गेल्याच वर्षी घटस्फोट झाला. शुभांगीने संगीतकार आनंद ओक यांच्यासोबत लग्न केलं होतं. लग्नानंतर ५ वर्षांनी ते वेगळे झाले.

घटस्फोटानंतर शुभांगीने तीन महिन्यातच नव्याने संसार थाटला. सुमित म्हशेळकरसोबत तिने दुसरं लग्न केलं आहे.

अभिनेत्री स्नेहा चव्हाणने अनिकेत विश्वासरावसोबत २०१८ मध्ये पहिलं लग्न केलं होतं. पण, लग्नानंतर काही वर्षांतच त्यांचा घटस्फोट झाला. स्नेहाने अनिकेत आणि त्याच्या कुटुंबीयांवर मानसिक आणि शारीरिक छळाचे आरोप केले होते.

त्यानंतर स्नेहाने २०२४ मध्ये मानससोबत दुसरं लग्न करत पुन्हा संसार थाटला. त्यांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झालं आहे.

















