अद्भुत योगायोग! ठिकाण आणि फोटो सेम टू सेम, अपूर्वा नेमळेकरने सांगितला Soulmateची कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 15:31 IST2026-02-27T15:09:51+5:302026-02-27T15:31:35+5:30

अपूर्वाने तिच्या नवऱ्यासोबतचा विलक्षण योगायोग सांगितला आहे.

रात्रीस खेळ चाले फेम अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर नुकतीच लग्नाच्या बेडीत अडकली आहे. अपूर्वाने १४ फेब्रुवारीला तनुज गोवलकरसोबत लग्न करत नव्याने संसाराला सुरुवात केली आहे.

लग्नाचे फोटो शेअर करत तिने ही गुडन्यूज चाहत्यांना दिली होती. आता अपूर्वाने तिच्या नवऱ्यासोबतचा विलक्षण योगायोग सांगितला आहे.

अपूर्वा २०२४ मध्ये सिंगापूरला फिरायला गेली होती. तिथल्या काही प्रेक्षणीय स्थळांना तिने भेटी दिल्या होत्या. याचे फोटोही तिने शेअर केले होते.

२०२५ मध्ये अपूर्वाचा नवरा तनुजही सिंगापूरला गेला होता. विशेष म्हणजे ज्या ज्या ठिकाणी अपूर्वाने फोटो काढले होते. त्याच ठिकाणी त्या सेम स्पॉटवर त्याने देखील फोटो काढले.

हे सर्व फोटो शेअर करत अपूर्वाने या अद्भुत योगायोग बद्दल चाहत्यांना माहिती दिली आहे.

२०२४ मध्ये मी सिंगापूरला गेले होते. लग्नानंतर मी तनुजचे सिंगापूरचे फोटो पाहिले. तो २०२५ मध्ये गेला होता.

सेम स्पॉट, सेम फ्रेम, सेम रस्ते फक्त वर्ष वेगळं. आम्ही सेम ठिकाणी उभे होतो. पण ती वेळ आमची नव्हती.

कधीकधी डेस्टिनी दोन soulmate ला पुन्हा पुन्हा भेटण्याची संधी देत असते. योग्य वेळ येईपर्यंत, तुम्ही पूर्णपणे तयार होईपर्यंत आणि तुमचा प्रवास खऱ्या अर्थाने सुरू होईपर्यंत...

कदाचित यालाच दोन आत्म्यांचा एक प्रवास असं म्हणत असतील.