PHOTOS: डीप नेक ड्रेसमुळे ट्रोल झाली अंकिता लोखंडे, यूजर्स म्हणाले- 'आता राखीही सुधारली आणि ही..'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2022 12:48 IST2022-07-01T12:34:11+5:302022-07-01T12:48:55+5:30

सोशल मीडियावर ट्रोल होण्याची अंकिता लोखंडेची ही पहिलीवेळा नाही.

अभिनेत्री अंकिता लोखंडे तिच्या पसर्नल आणि प्रोफोशनल लाईफमुळे चर्चेत असते. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.(Photo Instagram)

अनेकदा तिच्या फोटोंसह व्हिडिओ शेअर करत असते. पापाराझी अनेकदा इव्हेंट्स आणि अवॉर्ड शोमध्ये तिला कॅमेऱ्यात कैद करतात. (Photo Instagram)

अंकिता लोखंडे नुकतीच पती विकी जैनसोबत एका इव्हेंटमध्ये पोहोचली. या इव्हेंटसाठी तिने डीप नेकचा शिमरी गाउन परिधान केला होता. (Photo Instagram)

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर यूजर्सच्या ती निशाण्यावर आली. सोशल मीडियावर तिला ट्रोल केलं जातंय.(Photo Instagram)

परंतु कारमधून उतरताना ती या डिपनेकच्या ड्रेसमध्ये अनकंफर्टेबल असल्याचं पहायला मिळलं. यानंतर ती यूजर्सच्या निशाण्यावर आली आणि सोशल मीडियावर ट्रोल व्हायला लागली. (Photo Instagram)

एका यूजरने व्हिडिओवर कमेंट करत लिहिले- 'तुम्ही कम्फर्टेबल नसताना असे कपडे का घालता? दुसर्‍या यूजने लिहिले - हिचे संस्कार कुठे गेले आता?, असे कपडे घालून फिरते आहे. आणखी एका यूजरने लिहिले, 'आता राखी सावंतही सुधारली आहे आणि हीअसे कपडे घालतेय..'(Photo Instagram)

काही दिवसांपूर्वीच अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि विक्की जैन (Vicky Jain) यांनी स्मार्ट जोडी हा खिताब पटकावला आहे.(Photo Instagram)

स्मार्ट जोडी हा शो जिंकल्यानंतर विकी आणि अंकिताला ट्रॉफी देत सन्मानित करण्यात आलं. सोबतच त्यांना २५ लाख रुपयांची रोख बक्षीसाची रक्कमही देण्यात आली होती. यावेळी अंकिताने तिच्या भावना व्यक्त करत या संपूर्ण प्रवासाविषयी भाष्य केलं होतं..(Photo Instagram)