अंकिता लोखंडेचं ५० कोटींचं राजमहालासारखं घर पाहिलंत का? नवरा आहे मोठा कोळसा व्यापारी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 11:33 IST2026-02-25T11:24:40+5:302026-02-25T11:33:16+5:30

सध्या अंकिता आणि विकी जैन हे 'लाफ्टर शेफ्स ३' मधून प्रेक्षकांची मने जिंकत आहे. अशातच ही जोडी त्यांच्या आलिशान घरामुळे चर्चेत आली आहे.

अंकिता लोखंडे हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय चेहरा आहे. अंकिता लोखंडेनं 'पवित्र रिश्ता' या मालिकेतून टेलिव्हिजन विश्वात पाऊल ठेवलं होतं. या मालिकेतील तिचं अर्चना या पात्राला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं.

टेलिव्हिजन गाजवल्यानंतर अंकिताने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिने 'मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी' (२०१९) आणि 'बाघी ३' (२०२०) सारख्या चित्रपटांमध्ये काम केले. त्यानंतर ती 'पवित्र रिश्ता २.०' या वेब सीरिजमध्ये दिसली.

फक्त अंकिताचं नाही तर तिचा पती विकी जैनदेखील कायम चर्चेत असतो. व्यवसायाने कोळसा व्यापारी असलेला विकीदेखील इंडस्ट्रीमध्ये काम करतोय. व्यवसायासोबतच तो आपली कला जपतोय.

अंकिता आणि विकी जैन हे दोघे 'बिग बॉस १७' या रिॲलिटी शोमध्ये एकत्र सहभागी झाले होते. सध्या अंकिता आणि विकी जैन हे 'लाफ्टर शेफ्स ३' मधून प्रेक्षकांची मने जिंकत आहे.

अशातच ही जोडी त्यांच्या आलिशान घरामुळे चर्चेत आली आहे. मुंबईतील त्याच्या महालासारख्या घराची किंमत तब्बल ५० कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.

अंकिता आणि विकी जैन हे मुंबईतील एका अत्यंत आलिशान ८ BHK अपार्टमेंटमध्ये राहतात. या घराची तुलना अनेकदा मुकेश अंबानींच्या घराशी केली जाते.

अंकिता आणि विकीच्या या आलिशान घराची मुख्य थीम 'व्हाईट' (पांढरा रंग) आहे. हा रंग शांतता आणि प्रसन्नतेचे प्रतीक मानला जातो. घराच्या प्रत्येक कोपऱ्यात पांढऱ्या रंगाचा अतिशय कल्पकतेने वापर करण्यात आलेला आहे.

सेलिब्रिटी म्हटल्यावर कपड्यांची रेलचेल आलीच. यासाठी या जोडप्याने घरात एक भव्य 'वॉक-इन वॉर्डरोब' बनवला आहे.

तसेच, अंकिताचे स्वयंपाकघर (Kitchen) इतके मोठे आणि आधुनिक आहे की, ते कोणत्याही गृहिणीसाठी एक स्वप्नच ठरेल. विशेष म्हणजे, लिव्हिंग रूममध्ये पेस्टल रंगाचे सुंदर सोफे आणि महागडे गालिचे दिसतात. तर डायनिंग एरियामधील गोल्डन लाइटिंग राजेशाही अनुभव देणारी आहे.

अंकिताच्या घरातील पूजाघरही सुंदर आहे. मराठमोळी अंकिता प्रत्येक सण अगदी उत्साहात साजरा करते. दरम्यान, अंकिता व विकी जैन यांनी १४ डिसेंबर २०२१ ला लग्नगाठ बांधली होती.