अंकिता लोखंडेची जाऊबाईही दिसते सुंदर, फोटो पाहिले का? सौंदर्यात अभिनेत्रीला देते टक्कर
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 15:07 IST2025-06-11T14:41:07+5:302025-06-11T15:07:58+5:30
दोन मुलांची आई आहे अंकिताची जाऊबाई, नक्की काय करते विकीची वहिनी?

'पवित्र रिश्ता' फेम अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) टीव्हीवरील लोकप्रिय चेहरा आहे. तिच्या सौंदर्यामुळे भल्याभल्यांना घायाळ करते. वयाच्या ४० व्या वर्षीही तिचा फिटनेस, चेहऱ्यावरचा ग्लो तसाच आहे.
अंकिता आणि विकीची जोडी 'बिग बॉस' मुळे खूपच प्रसिद्ध झाली. यानिमित्ताने सर्वांना अंकिताच्या नवऱ्याबद्दल म्हणजेच विकी जैनबद्दलही समजलं. अंकिताची सासूही प्रसिद्ध झाली.
पण तुम्ही कधी अंकिताच्या जाऊबाईंना पाहिलंय का? अंकिताची जाऊ रेशू जैन (Reshu Jain) दोन मुलांची आई आहे. मात्र सौंदर्यात तिचीही स्तुती करावी तितकी कमीच आहे.
रेशू ही विकी जैनचा मोठा भाऊ विशाल जैनची पत्नी आहे. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. रेशूने सोशल मीडियावर कुटुंबासोबतचे अनेक फोटो शेअर केलेत.
रेशूने अंकितासोबतचे फोटोही पोस्टही केले आहेत. यावरुन अंकिताचा जावेसोबतही चांगला बाँड आहे हे दिसून येतं.
रेशू जैन दिसायला सुंदर, फीट आहे. अंकिताच काय कोणाही अभिनेत्रीला टक्कर देईल असं तिचं सौंदर्य आहे.
रेशू जैन ही फिजीओथेरपिस्ट आहे. शिवाय ती बिलासपूर येथे 'बिर्ला ओपन माइंड्स् इंटरनॅशनल स्कुलमध्ये मॅनेजिंग डायरेक्टर पदावर आहे. तिने आपल्या इन्स्टाग्राम बायकोमध्ये ही माहिती दिली आहे.
रेशू सोशल मीडियावर सक्रीय आहे. मुलांचे कॉमेडी रील्सही ती शेअर करत असते. तसंच जैन धर्मातील रिती-रिवाजांचंही ती या माध्यमातून दर्शन घडवते.