'बिग बॉस'चं घर गाजवणारी अंकिता लोखंडे आहे कोट्यवधींची मालकीण, जाणून घ्या तिचं नेटवर्थ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2023 12:24 PM2023-12-19T12:24:49+5:302023-12-19T12:28:20+5:30

'पवित्रा रिश्ता' मालिकेत अर्चना हे पात्र साकारून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अंकिता लोखंडेचा आज वाढदिवस आहे.

'पवित्रा रिश्ता' मालिकेत अर्चना हे पात्र साकारून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अंकिता लोखंडेचा आज वाढदिवस आहे. पहिल्याच मालिकेने अंकिताला प्रसिद्धी मिळवून दिली.

टेलिव्हिजनवरील लोकप्रिय बहूचा चेहरा असलेल्या अंकिताने पहिल्याच मालिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. त्यानंतर तिने अनेक चित्रपटांतही काम केलं.

कंगना रणौतच्या 'मणिकर्णिका' सिनेमात अंकिता महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती. या सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

'मणिकर्णिका' चित्रपटातील अंकिताची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. 'बागी ३'मध्येही अंकिता झळकली होती.

अंकिताने २०२१ साली व्यावसायिक विकी जैनबरोबर लग्नगाठ बांघत नव्या आयुष्याला सुरुवात केली. लग्नानंतर अंकिता आणि विकी अनेक रिएलिटी शोमध्ये दिसले.

ते 'बिग बॉस १७'मध्येही सहभागी झाले आहेत. अंकिता आणि विकी बिग बॉसच्या घरातील चर्चेतील चेहरे आहेत.

अंकिता पती विकीबरोबर मुंबईत ८ बीएचके असलेल्या आलिशान फ्लॅटमध्ये राहते. अंकिताला महागड्या गाड्यांची शौकिन असून मीडिया रिपोर्टनुसाक तिच्याकडे जॅग्वार एक्सजे आणि पोर्श ७१८ सारख्या कार आहेत.

मीडिया रिपोर्टनुसार, 'बिग बॉस'चं घर गाजवणारी अंकिता लोखंडे कोट्यवधींची मालकीण आहे. तिच्याकडे जवळपास २५ कोटींची संपत्ती आहे.

तर तिच्या पतीकडे १०० कोटींची संपत्ती आहे. (सर्व फोटो : अंकिता लोखंडे, इन्स्टाग्राम)