'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेतील राधिकाचा झाला मेकओव्हर, फोटो पाहून तुम्ही व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2021 03:02 PM2021-05-21T15:02:14+5:302021-05-21T15:14:57+5:30

माझ्या नवऱ्याची बायको फेम अनिता दाते सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिचे काही लेटेस्ट फोटोशूट तिने शेअर केलं आहे. (Photo Instagram)

पिवळ्या रंगाच्या साडीत अनिता खूपच सुंदर दिसते आहे. चाहत्यांना ही तिचे हे फोटोशूट खूप आवडले आहे. (Photo Instagram)

‘माझ्या नवऱ्याची बायको’ या छोट्या पडद्यावरच्या लोकप्रिय मालिकेने काही महिन्यांपूर्वीच प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी. अनिताने साकारलेली राधिकाची भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. (Photo Instagram)

अनिताने तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात खूप छोट्या मोठ्या भूमिका साकारल्या आहेत. (Photo Instagram)

हलकं फुलकं या नाटकात सागर कारंडेसोबत काम केले होते. एवढेच नव्हे तर राणी मुखर्जीच्या अय्या या चित्रपटात देखील तिने एक छोटीशी भूमिका साकारली होती. (Photo Instagram)

अनिता ही मुळची नाशिकची असून तिचे बालपण, शिक्षण नाशिकमध्ये झाले आहे. तिचे काका उपेंद्र दाते हे नाट्यक्षेत्रात प्रसिद्ध आहेत. (Photo Instagram)

पुण्याच्या ललित कला केंद्रातून तिने पदवी घेतली. अनिताला लहानपणापासूनच अभिनयाची आवड असल्याने ती शाळेत आणि कॉलेजमध्ये नाटकांमध्ये काम करत असे. (Photo Instagram)

माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतील भूमिकेमुळे तिच्या संपूर्ण करियरला कलाटणी मिळाली असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. (Photo Instagram)