Aishwarya Narkar : वयाची पन्नाशी उलटूनही ऐश्वर्या नारकर दिसतात खूप सुंदर, वेस्टर्न आउटफिटमधील फोटोंसमोर तरुणीही पडतील फिक्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2022 15:08 IST2022-12-31T14:59:49+5:302022-12-31T15:08:19+5:30

Aishwarya Narkar : ऐश्वर्या नारकर ५२ वर्षांच्या आहे. पण त्यांचे सौंदर्य तरूणींनाही लाजवेल असे आहे.

नाटक, मालिका, चित्रपट या तिन्ही माध्यमातून अभिनेत्री म्हणजे ऐश्वर्या नारकर यांनी रसिकांच्या मनावर आपली छाप उमटविली आहे.

ऐश्वर्या नारकर ५२ वर्षांच्या आहे. पण त्यांचे सौंदर्य तरूणींनाही लाजवेल असे आहे.

ऐश्वर्या नारकर सोशल मीडियावर सक्रीय असून त्या या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असतात.

तसेच त्या सोशल मीडियावर फोटोदेखील शेअर करत असतात.

नुकतेच ऐश्वर्या नारकर यांनी वेस्टर्न आउटफिटमधील फोटो शेअर केले आहेत.

ऐश्वर्या नारकर या फोटोत खूपच ग्लॅमरस दिसत आहेत.

चाहतेही या फोटोंच्या प्रेमात पडले आहेत. ५२ वर्षीय ऐश्वर्या यांचा हा ग्लॅमरस अंदाज पाहून चाहते घायाळ झालेत.

साडीमध्ये ऐश्वर्या कमालीच्या सुंदर दिसतात. पण वेस्टर्न लुकमधील त्यांचे फोटोही लक्ष वेधून घेतात.

ऐश्वर्या नारकर मराठी सिनेइंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

अपराध, धड़क, अंकगणित या व अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं आहे.

श्रीमंता घरची सून, दुहेरी,रेशीमगाठी,सोनपावले, या सुखांनो या,स्वामिनी, ये प्यार ना होगा कम,घर की लक्ष्मी बेटीयाँ अशा असंख्य मालिकांमध्ये त्या झळकल्या आहेत.

सध्या ऐश्वर्या नारकर सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेत पाहायला मिळत आहेत.