श्वेता शिंदेनंतर या मराठमोळ्या अभिनेत्रीचं पतीसह निर्मिती क्षेत्रात पदार्पण, जाणून घ्या तिच्याविषयी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2022 07:00 AM2022-08-07T07:00:00+5:302022-08-07T07:00:02+5:30

हे दोघे मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध कलाकार आहेत. झी मराठीवरील 'नवा गडी नवं राज्य' या मालिकेच्या माध्यमातून त्यांनी निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलं आहे.

उत्तम अभिनयकौशल्य आणि सौंदर्य यांच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे श्वेता शिंदे. परंतु, श्वेता केवळ अभिनेत्रीच नाही तर एक उत्तम निर्मातीदेखील आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

'लागिरं झालं जी', 'देवमाणूस', 'साता जल्माच्या गाठी', 'मिसेस मुख्यमंत्री' अशा एकाहून एक सरस मालिकांची निर्मिती करुन श्वेताने निर्मिती क्षेत्रातही आपला ठसा उमटवला आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

लवकरच तिची आप्पी आमची कलेक्टर ही नवी मालिका झी मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

श्वेता शिंदेनंतर आणखी एक अभिनेत्रीने निर्मिती क्षेत्रात आपल्या पतीसह पदार्पण केलं आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

ही अभिनेत्री दुसरी, तिसरी कुणी नसून श्रुती मराठे(shruti marathe) आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

श्रुतीने तमिळमधील 'प्रेम सूत्र', मराठीतील 'सनई चौघडे'सारखे सुपरहिट चित्रपट दिले आहेत. श्रुतीने विविध मराठी, तमिळ चित्रपटात काम केले आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

श्रुती अभिनेता आणि पती गौरव घाटणेकरसह निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलं आहे. त्यांची नवी मालिका झी मराठीवर लवकरच सुरु होणार आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

'नवा गडी नवं राज्य' ही त्यांची मालिका ८ ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

या मालिकेत अनिता दाते हिच्याशिवाय पल्लवी पाटील, वर्षा दांदळे अशी तगडी स्टारकास्ट असणार आहे. (फोटो इन्स्टाग्राम)