'ओम शांती ओम' मधून एन्ट्री! टीव्हीवरही झळकली; पण, तरीही 'या' अभिनेत्रीची जादू नाही चालली, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 17:01 IST2025-08-05T16:53:09+5:302025-08-05T17:01:07+5:30

'ओम शांती ओम' मधून केला डेब्यू! टीव्हीवरही अजमावलं नशीब; पण...

प्रत्येक कलाकारासाठी त्याच्या आयुष्यातील पहिली संधी महत्त्वाची असते. बऱ्याचदा असंही घडतं की करिअरमधील पहिलाच चित्रपटातून प्रसिद्धीझोतात आलेल्या नायिका नंतर इंडस्ट्रीत फारशा सक्रिय दिसत नाहीत.

अशीच एक अभिनेत्री जिने शाहरुख खान आणि दीपिका पादुकोणच्या सुपरहिट चित्रपटातून इंडस्ट्रीत एन्ट्री घेतली. परंतु, तिला फारसं यश मिळालं नाही. ही अभिनेत्री म्हणजे युविका चौधरी.

अभिनेत्री युविका चौधरीने 'बिग बॉस' हिंदी तसेच काही चित्रपटांमध्येही काम केलं आहे. शाहरुख खान आणि दीपिका पादुकोण स्टारर 'ओम शांती ओम' मधून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. मात्र, सौंदर्यामुळे कायम चर्चेत असणाऱ्या या अभिनेत्रीची जादू काही प्रेक्षकांवर चालली नाही.

'ओम शांती ओम' च्या यशानंतर युविकाने समर २००७, तो बात पक्की आणि नॉटी, द शॉकीन्स चित्रपटांमध्ये झळकली. परंतु, हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले.

त्यानंतर अभिनेत्रीने टीव्ही इंडस्ट्रीकडे आपला मोर्चा वळवला. 'इंडियाज बेस्ट सिनेस्टार्स की खोज', 'बिग बॉस-9',एमटीवी स्पिट्सविला 10', 'नच बलिए-9' च्या पर्वातही ती पाहायला मिळाली.

'नच बलिए-9' च्या पर्वात ती प्रिन्स नरुलासोबत दिसली. त्याचदरम्यान, युविका आणि प्रिन्सच्या प्रेमाची सुरुवात झाली.

बरीच वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर २०१८ मध्ये त्यांनी लग्न केलं. काही महिन्यांपूर्वीच युविकाने गोंडस लेकीला जन्म दिला. लग्नानंतर ६ वर्षांनी दोघं आईबाबा झाले.