Bus Bai Bus :ऋतुराज गायकवाडसोबतच्या 'अफेअर्स' वर अभिनेत्री सायली संजीवने केला मोठा खुलासा, म्हणाली- तो माझा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2022 12:20 IST2022-10-22T12:06:25+5:302022-10-22T12:20:10+5:30
सुबोध भावेने चेन्नई सुपरकिंग्जचा क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाडसोबतच्या अफेअरच्या चर्चांवरून सायलीला प्रश्न विचारला.

गेल्या बऱ्याच दिवसांपासून ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) आणि मराठी अभिनेत्री सायली संजीव यांच्या अफेयर्सची बरीच चर्चा रंगली आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
सायली संजीवने सोशल मीडियावर फोटो पोस्ट केला तरी चाहते तिला गायकवाड्यांच्या सूनबाई म्हणून चिडवतात. यावर अखेर सायली त्यांच्या नेमकं काय नातं आहे, याचा खुलासा केला आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
'हर हर महादेव' सिनेमाच्या प्रमोशनसाठी सायली बस बाई बस’ या मंचावर आली होती.(फोटो इन्स्टाग्राम)
'बस बाई बस’च्या मंचावर नुकतीच मराठी अभिनेत्री सायली संजीव आणि शरद केळकर यांनी हजेरी लावली होती. यावेळी दोघांसोबत धम्माल गप्पा रंगल्या. (फोटो इन्स्टाग्राम)
यावेळी सायलीला सुबोध भावेने चेन्नई सुपरकिंग्जचा क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाडसोबतच्या अफेअरच्या चर्चांवरून प्रश्न विचारला. (फोटो इन्स्टाग्राम)
यावर ती म्हणाली, तो माझा मित्र आहे. सायली म्हणाली, ऋतुराज आणि तुषार देशपांडे माझे मित्र आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)
ऋतुराजला माझी 'काहे दिया परदेस' ही मालिका आवडायची... असं जेव्हा त्यांनी मला सांगितले तेव्हा मलाच धक्का बसला की क्रिकेटपटू अशा मालिका पाहतात? असं ही सायली यावेळी म्हणाली.(फोटो इन्स्टाग्राम)
सायली संजीवला खरी ओळख झी मराठीवरील ‘काहे दिया परदेस’ या मालिकेतून मिळाली, तिची ‘गौरी’ ही व्यक्तिरेखा लोकांना खूप आवडली होती. (फोटो इन्स्टाग्राम)
तिला छोट्या पडद्यावर ‘परफेक्ट पाटी’, ‘गुलमोहर’ यांसारख्या मालिकेतून खूप यश मिळाले. अलीकडेच तिने ‘शुभमंगल ऑनलाइन’ या टीव्ही मालिकेत काम केले आहे.(फोटो इन्स्टाग्राम)