ऐकावं ते नवल! घराचं भाडं भरण्यासाठी 'या' अभिनेत्री केलं लग्न; पहिली भेट झाली अन्..
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 15:24 IST2025-07-21T14:36:23+5:302025-07-21T15:24:26+5:30
बॉलिवूड सिनेमा आणि कलाकरांबद्दल जाणून घेण्यास प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता असते. पण, बॉलिवूडमध्ये काही कलाकार असेही आहेत जे पहिल्याच भेटीत एकमेकांच्या प्रेमात पडले आणि ते आयुष्यभराचे सोबती बनले.

इंडस्ट्रीतील कलाकारांच्या लव्हलाईफचे अनेक किस्से समोर येतात. अशीच एक अभिनेत्री जिच्या लग्नाची एकेकाळी जोरदार चर्चा सुरु झाली होती. ही अभिनेत्री म्हणजे निवेदिता भट्टाचार्य.
निवेदिता भट्टाचार्य ही हिंदी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. आजपर्यंत तिने अनेक टीव्ही शो, वेब सिरीज आणि चित्रपटांमध्ये काम करुन आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवला आहे.
'रिश्ते', 'कुंडली', 'बालिका वधू', 'साथ फेरे: सलोनी का सफर' अशा मालिकांमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडणारी अभिनेत्री निवेदिता भट्टाचार्य बॉलिवूड अभिनेता के.के.मेननची पत्नी आहे. परंतु, या जोडप्यातची लव्हस्टोरी खूपच इंट्रेस्टिंग आहे.
के. के मेनन हे नाव बॉलिवूड इंडस्ट्रीतील नावजलेल्या कलाकरांपैकी एक आहे. के.के.मेनन यांनी चित्रपटांमध्ये मोजक्याच भूमिका केल्या पण त्या चांगल्या गाजल्या. राम गोपाल वर्मा यांच्या सरकार चित्रपटातील त्यांची भूमिका विशेष गाजली.
अशी झाली पहिली भेट
निवेदिता आणि के.के. मेनन यांची भेट त्यांच्या थिएटरच्या दिवसांत झाली. दोघांची भेट एका नाटकाच्या रिहर्सल दरम्यान झाली. त्यांनी एकत्र काम केले, मैत्री झाली आणि अखेर त्यांची मैत्री प्रेमात बदलली.
पण, तुम्हाला माहित आहे का? या जोडप्याने घराचं भाडं वाचवण्यासाठी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.
एका मुलाखतीत निवेदिता भट्टाचार्यने खुलासा केला होता. "आम्ही करिअरमध्ये सुरुवातीला अशा टप्प्यावर जेव्हा जिथे आम्ही इंडस्ट्रीमध्ये स्वत स्थान निर्माण करण्यासाठी धडपड करत होतो. आम्ही काम शोधात होतो, नुकतीच आमच्या करिअरला सुरुवात झाली होती. मग आम्ही ठरवलं की आपण लग्न करूया. दोन वेगवेगळ्या घरांचे भाडे देण्यापेक्षा, आम्हाला फक्त एका घराचे भाडे द्यावे लागेल. असा निर्णय आम्ही घेतला होता. दरम्यान, आम्ही लग्न लपवून ठेवलं होतं. "