PHOTOS : हा सागरी किनारा..., अभिज्ञा भावे-मेहुलचं समुद्र किनारी रोमॅन्टिक फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2023 04:23 PM2023-01-17T16:23:43+5:302023-01-17T16:33:17+5:30

Abhidnya Bhave : अभिज्ञाने 06 जानेवारी 2021 मध्ये मेहुल पैसोबत लग्नगाठ बांधली. नुकतीच दोघांनी सुखी संसाराची दोन वर्षे पूर्ण केली आहेत...

खुलता कळी खुलेना आणि तुला पाहते रे या मालिकांमधून घराघरांत पोहोचलेली मराठमोळी अभिनेत्री अभिज्ञा भावेचा सोशल मीडियावर प्रचंड ॲक्टिव्ह आहे.

पण सध्या चर्चा आहे ती अभिज्ञाने शेअर केलेल्या फोटोंची. होय, अभिज्ञाने नवऱ्यासोबतचे रोमॅन्टिक फोटो शेअर केले आहेत. निमित्त अर्थातच नुकत्याच साजऱ्या झालेल्या मकरसंक्रातीचं.

या फोटोशूटमध्ये अभिज्ञा व तिचा पती मेहुल दोघंही समुद्रकिनारी रोमॅन्टिक पोझ देताना दिसत आहेत. समुद्रकिनारी हातात हात घेत दोघेही रोमँटिक झाले आहेत.

अभिज्ञाने 06 जानेवारी 2021 मध्ये मेहुल पैसोबत लग्नगाठ बांधली. नुकतीच दोघांनी सुखी संसाराची दोन वर्षे पूर्ण केली आहेत.

अभिज्ञा आणि मेहुल एकाच कॉलेजमध्ये शिकत होते. 15 वर्षांपासून हे दोघे एकमेकांना ओळखायचे. मात्र कॉलेजनंतर त्यांचा संपर्क तुटला होता. काही दिवसांनी हे दोघे पुन्हा एकमेकांच्या संपर्कात आले.

पुन्हा भेटल्यावर त्यांच्यातली मैत्री पुन्हा फुलत गेली. मैत्रीचं रुपांतर प्रेमात झाले. मेहुलचा देखील घटस्फोट झाला असल्यानं दोघांनीही त्यांच्या नात्याला लग्नात रुपांतर करण्याचा निर्णय घेतला.

लग्नानंतर काही महिन्यातच मेहुलला कॅन्सरचं निदान झालं. पण या कठीण काळात अभिज्ञा खंबीरपणे मेहुलच्या पाठीशी उभी राहिली. काही महिन्यांच्या उपचारानंतर मेहुल कॅन्सरमुक्त झाला.

अभिज्ञाबद्दल सांगायचे तर तिला सर्वच ओळखतात. मराठी आणि हिंदी टेलिव्हिजन क्षेत्रात अभिज्ञा भावेचा मोठा चाहतावर्ग आहे.