संजिदा शेखसोबत ब्रेकअप झाल्यानंतर आमिर अली पुन्हा पडला प्रेमात? दिसला मिस्ट्री गर्लसोबत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 20:16 IST2021-01-15T20:16:33+5:302021-01-15T20:16:33+5:30

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता आमिर अलीने सोशल मीडियावर व्हेकेशनचे काही फोटो पोस्ट केले आहेत.
या फोटोंमध्ये आमिर सोबत एक मुलगी पाहायला मिळत आहे.
आमिरसोबत दिसत असलेल्या या मुलीचा चेहरा फोटोंमध्ये स्पष्ट दिसत नाहीये.
आमिर आणि या मुलीचा रोमँटिक अंदाज आपल्याला फोटोंमध्ये पाहायला मिळत आहे.
आमिरचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून ही मुलगी कोण आहे असे त्याचे फॅन्स त्याला सोशल मीडियाच्या द्वारे विचारत आहेत.
आमिरने या फोटोसोबत Shhhhhh असे कॅप्शन दिले आहे.
आमिर अलीने संजिदा शेखसोबत लग्न केले होते. पण ते गेल्या अनेक महिन्यांपासून वेगळे राहात आहेत.