पाहा आई कुठे काय करते फेम मधुराणी प्रभुलकरच्या खऱ्या आयुष्यातील मुलीचे फोटो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 06:00 IST2021-05-08T06:00:00+5:302021-05-08T06:00:02+5:30

आई कुठे काय करतेची आई-अरुंधती अर्थात अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरने आपल्या अभिनयाने आणि सोज्वळ स्वभावाने चाहत्यांचे मन जिंकून घेतले आहे.
मधुराणीने अनेक मालिकांमध्ये काम केले असले तरी तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता या मालिकेमुळे मिळाली.
मधुराणीला मालिकेत एक मोठी मुलगी असल्याचे दाखवण्यात आले आहे. पण खऱ्या आयुष्यात तिची मुलगी खूपच छोटी आहे.
मधुराणी सोशल मीडियावर अनेकवेळा तिच्या कुटुंबियांसोबतचे फोटो पोस्ट करत असते.
मधुराणी अनेकवेळा तिच्या रिल आणि रिअल लाईफमधील मुलीचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.
मधुराणी मालिकेत नेहमीच साधी साडी, वेणी अशा रूपात दिसते. पण खऱ्या आयुष्यात तिचा लूक खूपच वेगळा आहे.
मधुराणी अनेकवेळा पाश्चिमात्य ड्रेसमध्ये सोशल मीडियावर तिचे फोटो पोस्ट करते. तिचे हे रूप तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडते.
मधुराणी चित्रीकरणात कितीही व्यग्र असली तरी तिच्या मुलीला, कुटुंबियांना आवर्जून वेळ देते.
मधुराणीची मुलगी अतिशय गोड असल्याचे तिचे चाहते नेहमीच सोशल मीडियाद्वारे सांगत असतात.