कपाळी चंद्रकोर, नाकात नथीचा रुबाब अनघाचा साज श्रृंगार पाहून अभिषेकचं काय तुम्हीही पडाल प्रेमात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2022 06:30 PM2022-03-05T18:30:10+5:302022-03-05T18:41:09+5:30

Aai Kuthe Kay Karte: 'आई कुठे काय करते'मधील अनघा उर्फ अश्विनी महांगडे (Ashvini Mahangade) हिने मराठमोळा साज श्रृंगारात फोटोशूट केले आहे. तिच्या या फोटोंना खूप पसंती मिळते आहे.

स्टार प्रवाह वाहिनीवरील आई कुठे काय करते या मालिकेने कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे.

या मालिकेत अनघाची भूमिका अभिनेत्री अश्विनी महांगडे हिने साकारली आहे.

या मालिकेतील अश्विनीने साकारलेल्या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळताना दिसते आहे.

अश्विनी महांगडे सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे आणि ती या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते.

नुकतेच अश्विनीने मराठमोळ्या साज श्रृंगारातील फोटो शेअर केले आहेत.

या फोटोत अश्विनीने निळ्या रंगाच्या नऊवारी साडीवर कपाळावर चंद्रकोर, नाकात नथ, सोनेरी सर आणि ठुशी परिधान केलेली दिसते आहे.

या फोटोत अश्विनी खूपच सुंदर दिसते आहे.

अश्विनी महांगडे हिच्या या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.

या फोटोशूटमध्ये अश्विनी घोड्यावर बसलेली दिसली आणि तिच्या हातात झेंडा पाहायला मिळाला.

अश्विनी महांगडेचा हा अंदाज चाहत्यांना खूप भावतो आहे.