नवऱ्याबरोबर रोमँटिक झाली 'आई कुठे...' फेम अभिनेत्री, बीचवरील फोटो झाले व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2024 01:11 PM2024-05-23T13:11:28+5:302024-05-23T13:15:58+5:30

'आई कुठे काय करते' ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेत माया हे पात्र साकारून अभिनेत्री अक्षया गुरव घराघरात पोहोचली.

'आई कुठे काय करते' ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेत माया हे पात्र साकारून अभिनेत्री अक्षया गुरव घराघरात पोहोचली.

अक्षया सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नवीन प्रोजेक्टबरोबरच वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्सही ती चाहत्यांना देत असते.

सध्या ती नवऱ्यासोबत व्हॅकेशन एन्जॉय करत आहे. याचे काही फोटो तिने शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये अक्षया आणि तिच्या पतीचा बीचवरील रोमँटिक अंदाज पाहायला मिळत आहे. अक्षयाने निळ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस परिधान केला आहे.

अक्षया आणि तिचा पती भूषण यांचा आज लग्नाचा वाढदिवस आहे. त्यांना चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

अक्षयाचा पतीबरोबर रोमँटिक अंदाज पाहून चाहतेही थक्क झाले आहेत. तिच्या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

अक्षया ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. अनेक मालिका आणि सिनेमांमध्येही तिने काम केलं आहे.

'राधा प्रेम रंगी रंगली', 'लव्ह लग्न लोचा' या मालिकांमध्ये ती महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसली होती.