‘Aai Kuthe Kaay Karte’तील अनिरूद्धचे हे जुने फोटो पाहिलेत का? डोळ्यांवर बसणार नाही विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2022 03:10 PM2022-02-15T15:10:19+5:302022-02-15T15:33:39+5:30

Aai Kuthe Kaay Karte : ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील अनिरूद्धला आज कोण ओळखत नाही? अभिनेते मिलिंद गवळी अनिरूद्धची भूमिका साकारत आहेत.

‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील अनिरूद्ध आणि अरूंधतीला आज कोण ओळखत नाही? मालिका इतकी गाजतेय की, या पात्रांची खरी ओळखही मागे पडावी.

‘आई कुठे काय करते’मध्ये अभिनेते मिलिंद गवळी अनिरूद्धची भूमिका साकारत आहेत. या मालिकेने मिलिंद घराघरात पोहोचले. मिलिंद अनेक वर्षांपासून टीव्ही, मराठी व हिंदी सिनेइंडस्ट्रीत अ‍ॅक्टिव्ह आहेत.

आज मिलिंद यांचे काही जुने फोटो घेऊन आम्ही आलो आहोत. हे फोटो पाहून हाच का अनिरूद्ध यावर क्षणभर विश्वास बसणार नाही.

तुम्हाला कदाचित माहित नसेल पण बालकलाकार म्हणून मिलिंद गवळी यांनी सिनेसृष्टीत पर्दापण केले होते.

अभिनय आणि चित्रपटांची आवड त्यांना लहानपणापासूपच होती. अभिनयक्षेत्रात काही तरी करून दाखवाचं, हे स्वप्न त्यांनी खूप आधीच पाहिलं होतं. अभिनयाची आवड त्यांना त्यांच्या स्वप्नांच्या जवळ घेऊन आली.

मराठीत त्यांनी आम्ही का तिसरे, शूर आम्ही सरदार, ढोलकीच्या तालावर, वैभवलक्ष्मी, सख्खा भाऊ पक्का वैरी, सून लाडकी सासरची, सासर माझे मंदिर, सासूच्या घरात अशा चित्रपटात काम केले आहेत.

मराठीसोबत हिंदीतही त्यांनी अनेक मालिका आणि चित्रपटात काम करत तिथे आपल्या अभिनयाचा झेंडा रोवला आहे.

मल्याळ सिनेमातही त्यांनी आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली. आर्यन या मल्याळम चित्रपटातही त्यांनी भूमिका साकारली.

2016 साली त्यांनी दिग्दर्शन क्षेत्रातही पाऊल ठेवलं. अथांग हा त्यांनी दिग्दर्शित केलेला पहिला सिनेमा.

हिंदीत त्यांनी वक्त से पहले, चंचल, वर्तमान, अनुमती, हो सकता है अशा चित्रपटात काम केले आहे. सध्या ते आई कुठे काय करते या मालिकेद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत.