Swara Bhaskar: मुंबईसह दिल्लीत आलिशान घर, महागड्या कार; स्वरा भास्करकडे आहे कोट्यवधींची संपत्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2023 11:36 AM2023-02-17T11:36:05+5:302023-02-17T11:58:33+5:30

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhasker) ही फहाद झिरार अहमदसोबत (Fahad Zirar Ahmad) विवाहबद्ध झाली.

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhasker) ही फहाद झिरार अहमदसोबत (Fahad Zirar Ahmad) विवाहबद्ध झाली. फहाद जिरार हा सामाजिक कार्यकर्ता असून समाजवादी पक्षाची युवक आघाडी असलेल्या समाजवादी युवजन सभा या संघटनेचा महाराष्ट्र अध्यक्ष आहे.

स्वरा आणि फहाद यांनी कोर्ट मॅरेज केले आहे. स्वरानं तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरील एक व्हिडीओ शेअर करुन फहाद आणि तिच्या लग्नाची माहिती दिली आहे.

काही महिन्यांपूर्वी स्वरा 'जहां चार यार' या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस आली. या चित्रपटामध्ये स्वरासोबत मेहर विज, शिखा तसलानिया आणि पूजा चोप्रा या अभिनेत्री प्रमुख भूमिका साकारली.

स्वरा ही विविध विषयांवरील मतं सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करत असते. काही दिवसांपूर्वी स्वरानं श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाबाबत देखील ट्वीट केले होते. रणवीर सिंहचं न्यूड फोटोशूट 'द कश्मीर फाइल्स' चित्रपट या विषयांबाबत देखील तिनं सोशल मीडियावर आपली मतं व्यक्त केली होती.

स्वराला इन्स्टाग्रामवर १ मिलियन एवढे फॉलोवर्स आहेत. स्वरा इन्स्टाग्रामवर विविध लूकमधील फोटो शेअर करत असते. तिच्या सोशल मीडियावरील पोस्टला नेटकऱ्यांची पसंती मिळते. तसेच स्वराच्या कमाईबद्दल बोलायला गेलो तर तिची नेटवर्थ कोटींमध्ये असून एका चित्रपटासाठी ती मोठी रक्कम घेते.

स्वरा भास्करचा जन्म दिल्लीत झाला असून सुरुवातीला तिने छोट्या पडद्यावर काम केले. स्वरा तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. विरे दी वेडींग, गुजारिश, तन्नू वेड्स मनू, रांझणा, तनू वेड्स मनू रिटर्न्स, प्रेम रतन धन पायो, नील बट्टे सन्नाटा या चित्रपटांमधून स्वराच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.

मिळालेल्या माहितीनूसार, स्वरा भास्करची नेटवर्थ जवळपास ५ मिलियन डॉलर इतकी आहे. म्हणजेच भारतीय चलनानूसार स्वरा ४० कोटी रुपये कमावते. ती एका चित्रपटासाठी ४ ते ५ कोटी रुपये आकारते.

चित्रपटांव्यतिरिक्त स्वरा भास्कर सोशल मीडिया आणि ब्रँड एंडोर्समेंटच्या माध्यमातूनही मोठी कमाई करते. सोशल मीडियावरील तिच्या फोटोंद्वारेच नाही तर राजकारण किंवा इतर क्षेत्रांशी संबंधित महत्त्वाच्या मुद्द्यांवरही ती खूप चर्चेत राहते. स्वरा अनेक प्रसिद्ध ब्रँडशी देखील संबंधित आहे आणि तिथून खूप कमाई करते. तिने समर्थन केलेल्या ब्रँड्समध्ये तनिष्क ज्वेलरी, फॉर्च्यून रिफाइंड ऑइल आणि स्प्राईट यांचा समावेश आहे.

स्वराचे वडील, भारतीय नौदलात अधिकारी आणि आई दिल्लीच्या जेएनयूमध्ये प्रोफेसर आहेत. त्यांची दिल्ली आणि मुंबईत घरे आहेत, त्यांचीही किंमत कोट्यावधींमध्ये आहे.

बॉलीवूड सेलिब्रिटी स्वरा भास्करही महागड्या वाहनांची शौकीन असून तिच्या कार कलेक्शनमध्ये एकापेक्षा जास्त कारचा समावेश आहे. स्वराच्‍या या करोडोंच्‍या कलेक्‍शनमध्‍ये तिची सर्वात आवडती कार BMW X1 असल्‍याचे बोलले जात आहे. या कारची किंमत सुमारे ४८ लाख रुपये आहे. याशिवाय तिच्याकडे इतरही अनेक आलिशान वाहने देखील आहे.