अप्रतिम! बिग बॉसच्या घरासारखं आलिशान आहे अंकिता-विकीचं व्हाईट हाऊस, कमाल इंटीरियर अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2023 17:48 IST2023-10-17T17:34:04+5:302023-10-17T17:48:23+5:30
Ankita Lokhande : कपलचं मुंबईत बिग बॉसपेक्षाही आलिशान घर आहे. या घराची झलक पाहुया...

लोकप्रिय कपल अंकिता लोखंडे आणि विकी जैन सध्या 'बिग बॉस 17' मध्ये दिसत आहेत. पहिल्या दिवसापासून या दोघांची तुफान चर्चा रंगली आहे. या कपलचं मुंबईत बिग बॉसपेक्षाही आलिशान घर आहे. या घराची झलक पाहुया...
'पवित्र रिश्ता' या टीव्ही शोमध्ये अर्चनाची भूमिका साकारून घराघरात प्रसिद्ध झालेली अंकिता लोखंडे आज छोट्या पडद्यावरील टॉपची अभिनेत्री आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूतसोबत ब्रेकअप झाल्यानंतर काही वर्षांनी अंकिताने विकी जैनसोबत लग्न केलं.
आता हे कपल मुंबईत एका आलिशान घरात राहतं. जे पाच हजार स्क्वेअर फूटमध्ये पसरलेलं आहे. या कपलने त्यांच्या निवासस्थानाला ‘द व्हाईट हाऊस’ असं नाव दिलं आहे.
अंकिता सोशल मीडियावर सक्रिय असून ती नेहमीच ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. त्याचबरोबर विकी आणि अंकिता अनेकदा सोशल मीडियावर चाहत्यांना त्यांच्या सुंदर घराची झलक दाखवत असतात.
अंकिताच्या घरात तुम्हाला एक सुंदर मंदिरही पाहायला मिळेल. ज्यामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती बसवण्यात आली आहे.
य़ा आलिशान घराला बाल्कनी आहे. जी मोठ्या परिसरात पसरलेली असून त्यात वुडन वर्क करण्यात आलं आहे.
अंकिता आणि विकीच्या घरात पाच मोठ्या बेडरूम आहेत. ज्याचे इंटीरियर अतिशय सुंदर आहे. याशिवाय या कपलचं हे घर सर्व सुखसोयी, सुविधा आणि तंत्रज्ञानाने सजलेलं आहे.
फक्त लिविंग रुम आणि बेडरूमच नाही तर अभिनेत्रीच्या घरातील बाथरूमही आलिशान आहे. ज्यात पंचतारांकित हॉटेलसारख्या सुविधा आहेत.
अंकिताने आपल्या अभिनयाने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. अंकिता लोखंडे सध्या बिग बॉसच्या घरात दिसत आहे. जिथे तिने पती विकी जैनसोबत एन्ट्री घेतली.