Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : बागाची बावरी! तिचे फोटो पाहून बबीताजीला विसराल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2021 20:52 IST2021-10-07T20:45:28+5:302021-10-07T20:52:24+5:30

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : मोनिका जरी आता या शोमध्ये नसली तरीही बागाची गर्लफ्रेंड म्हणून अजूनही चाहत्यांमध्ये चर्चेत असते.

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील बागाची गर्लफ्रेन्ड बावरी आठवतं असेलच. म्हणजे कोण तर अभिनेत्री मोनिका भदौरिया होती.

मोनिका आता या शोमध्ये नाही. तिने कधीच मालिका सोडली. पण म्हणून तिची चर्चा कमी नाही.

सोशल मीडियाच्या माध्यमातून ती सतत चाहत्यांच्या संपर्कात असते. सध्या तिच्या फोटोंची चर्चा होतेय.

तिचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय.

हे फोटो पाहून हीच ती बावरी यावर विश्वास बसत नाही. चाहत्यांनी या फोटोंवर कमेंटस वर्षाव केला आहे.

मोनिका 6 वर्ष या शोमध्ये काम करत होती. त्यानंतर काही वैयक्तीक कारणांमुळे तिने हा शो सोडण्याचा निर्णय घेतला.

मोनिका आपल्या फिटनेसची खूप जास्त काळजी घेते. व्यायाम आणि आहार यावर तिचा भर असतो.