अंकिता लोखंडेनं आईसह केलं गौरीपूजन; म्हणाली.... 'देव आमच्यासोबत आहे.',पाहा खास फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2020 20:30 IST2020-08-25T20:05:16+5:302020-08-25T20:30:16+5:30

सुशांत सिंह राजपूतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेही आपल्या घरी लाडक्या बाप्पाची स्थापना केली. या निमित्ताने कलाकारांनी सोशल मीडियावर आपले फोटोज् शेअर केले.
अंकितानेही आजच्या गौरीपूजनाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अंकिताने आपल्या आईसोबत गौरीपुजन केलं आहे.
अंकिताचा पारंपारिक मराठमोळा लूक तुम्हाला या फोटोच्या माध्यमातून पाहता येईल. साडीत अंकिताचे सौंदर्य खुललेलं दिसून येत आहे.
अंकिताने पुजेचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. 'महालक्ष्मी पूजा, देव नेहमी आमच्यासोबत आहे'. असं कॅप्शन फोटोंना दिलं आहे.
आपल्या आईसोबत वेगवेगळ्या पोज देत काढलेले फोटो अंकिताने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
सुशांतच्या आत्महत्येनंतर गेल्या अनेक दिवसांपासून अंकीता चर्चेत आहे. अनेकदा अंकितावरही आरोप करण्यात आले होते. परंतू परिस्थितीला सामोरं जात अंकितानं हे आरोप फेटाळून लावले आहेत.
सध्या सुशांत सिंग राजपूत प्रकरणाची चौकशी सीबीआय करत आहे.
(Image credit- Instagram)