मुलगी सुहानासाठी शाहरुख खानची पत्नी गौरी बनली फोटोग्राफर, पहा हे फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2020 17:21 IST2020-05-15T17:21:32+5:302020-05-15T17:21:32+5:30

शाहरूख खानची मुलगी सुहाना खान गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत असते.
सुहानाने आतापर्यंत बॉलिवूडमध्ये पदार्पण केले नाही. पण ती सेलिब्रेटीपेक्षा कमी नाही.
सुहानाचा फोटो समोर आला जो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
सुहानाच्या या फोटोंना खूप पसंती मिळते आहे. फोटोंमध्ये सुहानाचा नो मेकअप लूक पहायला मिळतो आहे.
सुहानाचे हे फोटो गौरी खानने क्लिक करून सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
फोटोत सुहाना विना मेकअप दिसते आहे. फोटो शेअर करत गौरीने लिहिले की, नो हेअर, नो मेकअप फक्त माझी फोटोग्राफी
तर सुहानाने फोटो शेअर करत लिहिले की माझ्या आईने फोटो क्लिक केले आहेत.