Hit and run: २१ वर्षांच्या मुलाला कारने चिरडलं अन् पळून गेली; कोण आहे नंदिनी कश्यप?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 10:56 IST2025-07-31T10:40:32+5:302025-07-31T10:56:51+5:30

अभिनेत्रीचा 'कार'नामा! २१ वर्षांच्या मुलाला कारने चिरडलं अन् पळून गेली; कोण आहे नंदिनी कश्यप?

अभिनेत्री नंदिनी कश्यपला बुधवारी हिंट अँड रन प्रकरणात अटक करण्यात आली. नंदिनीच्या भरधाव कारने २१ वर्षीय तरुणाला चिरडलं होतं. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली.

२५ जुलैला पहाटे ३ वाजताच्या सुमारास नंदिनीच्या कारने २१ वर्षीय समीउल हक याला धडक दिली. त्यानंतर नंदिनीने तेथून पळ काढला होता. मंगळवारी(२९ जुलै) रात्री त्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

समीउल हक हा गुवाहाटी महानगरपालिकेच्या टीमसोबत रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करत होता. तो स्ट्रीटलाइट दुरुस्त करत असताना कश्यपच्या भरधाव बोलेरो एसयूव्हीने त्याला धडक दिली. ही बोलेरो नंदिनी कश्यप चालवत होती.

गुवाहाटी पोलिसांनी नंदिनीला मंगळवारी चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. तिच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम १०५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नंदिनी कश्यप ही आसामची आहे. काही सिनेमांमध्ये तिने काम केलं आहे. अभिनेत्री असण्यासोबतच ती एक डान्सर आणि मॉडेलही आहे.

२०१८ पासून ती सिनेसृष्टीत कार्यरत आहे. अलिकडेच ती 'रुद्र' या सिनेमात दिसली होती.

नंदिनी सोशल मीडियावर सक्रिय असते. तिचे इन्स्टाग्रावर ५२.५ हजार फॉलोवर्स आहेत.

हिट अँड रनची बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर विद्यार्थी संघटनांकडून अभिनेत्रीच्या अटकेची मागणी केली जात होती.

अपघाताच्या घटनेनंतर पाच दिवसांनी नंदिनीवर कारवाई करत पोलिसांनी तिला अटक केली आहे.