जगासाठी 'अशुभ' पण अल्लू अर्जुनसाठी सुपर 'लकी'! लक्झरी गाड्यांपासून मोबाईलपर्यंत एकच आकडा दिसे
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2026 17:41 IST2026-04-10T17:37:29+5:302026-04-10T17:41:12+5:30
अल्लू अर्जुन एका अशा अंकाचा चाहता आहे, ज्याला जगभरात 'अशुभ' मानलं जातं

फक्त सामान्य नागरिकच नाही, तर ग्लॅमर जगतातील बडे कलाकारदेखील यश आणि आनंदप्राप्तीसाठी अनेक गोष्टींवर विश्वास ठेवतात. कुणी विशिष्ट राशीची अंगठी घालतं, तर कुणी आपल्या नावाच्या स्पेलिंगमध्ये बदल करतं.

लोकप्रिय अभिनेता अल्लू अर्जुन (Allu Arjun) देखील याला अपवाद नाही. सुशिक्षित आणि प्रचंड यशस्वी असूनही अल्लू अर्जुन एका अशा अंकाचा चाहता आहे, ज्याला जगभरात 'अशुभ' मानलं जातं. तो अंक आहे '६६६'.

पाश्चिमात्य संस्कृती आणि ख्रिश्चन मान्यतेनुसार '६६६' हा अंक शैतानी किंवा अशुभ (Number of the Beast) मानला जातो.

अनेक लोक हा अंक वापरणं टाळतात. मात्र, अल्लू अर्जुनसाठी हा अंक शांतता, स्थैर्य आणि स्टाईलचे प्रतीक आहे.

एका मुलाखतीत त्याने स्पष्ट केले होते की, हा अंक त्याला जीवनात सकारात्मकता आणि स्थिरता देतो.

अल्लू अर्जुनच्या लक्झरी लाइफस्टाईलमध्ये हा अंक प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळतो. त्याच्या ताफ्यातील महागड्या गाड्यांच्या नंबर प्लेट्सवर आवर्जून '६६६' हाच आकडा असतो.

इतकंच नाही, तर त्याचा वैयक्तिक मोबाईल नंबरमध्येही याच अंकांचा समावेश आहे. यशाच्या शिखरावर असूनही या विशिष्ट नंबरप्रती असलेलं त्याचं वेड चाहत्यांसाठी नेहमीच कुतूहलाचा विषय ठरलं आहे.

'पुष्पा'च्या जागतिक यशानंतर अल्लू अर्जुनच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली आहे. सध्या त्याच्याकडे अंदाजे ४०० कोटी रुपयांची संपत्ती असून, तो एका चित्रपटासाठी चक्क १०० ते १२५ कोटी रुपये मानधन घेतो.

अल्लू अर्जुनने स्नेहा रेड्डीशी २०११ मध्ये विवाह केला असून, त्याला अरहा व अयान ही दोन अपत्ये आहेत.

लवकरच तो दिग्दर्शक एटलीच्या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे नाव 'राका'असे असून, यामध्ये अल्लू अर्जुनसोबत बॉलिवूड सुंदरी दीपिका पादुकोण (Deepika Padukone) मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

















