चित्रपटाच्या सेटवर पहिली भेट, तीन वर्ष डेटिंग अन्...; अखेर रश्मिकाचा 'विजय' झाला; फिल्मी आहे लव्हस्टोरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 12:46 IST2026-02-27T12:11:47+5:302026-02-27T12:46:04+5:30
काय सांगता!'या' चित्रपटानंतर सुरु झालेली रश्मिका-विजय यांची लव्हस्टोरी, आता आयुष्यभराचे सोबती झाले

सध्या मनोरंजनविश्वात एकच चर्चा आहे ती म्हणजे रश्मिका आणि विजय देवरकोंडा या नवोदित जोडप्याची.अभिनेत्री रश्मिका मंदान्ना आणि अभिनेता विजय देवरकोंडा ही दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील नावाजलेली नावं आहेत. या सेलिब्रिटी कपलची फिल्म्समधील केमिस्ट्री अनेकांना आवडते.

आता खऱ्या आयुष्यातही ते एक झाले.काल २६ फेब्रुवारी रोजी उदयपूरमध्ये लग्न करून विजय रश्मिकाने आयुष्यातील एका नवीन अध्यायाला सुरुवात केली. मात्र, त्यांच्या प्रेमकहाणीला कशी सुरुवात झाली माहितीये का?

विजय देवरकोंडा आणि अभिनेत्री रश्मिका मंदानाची लव्हस्टोरी फारच फिल्मी आहे. मैत्रीतून सुरू झालेलं हे नातं हळूहळू प्रेमात बदललं आणि अनेक वर्षे त्यांनी ते अतिशय खासगी ठेवणं पसंत केलं.

मीडिया रिपोर्टनुसार, विजय आणि रश्मिकाची पहिली भेट ही २०१८ साली आलेल्या 'Geetha Govindam' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान झाल्याचं सांगण्यात येतं.पडद्यावरील त्यांची ऑनस्क्रिन केमिस्ट्री अनेकांना भावली.

यानंतर, ही जोडी दक्षिण चित्रपटसृष्टीतील हिट जोडप्यांपैकी एक म्हणून ओळखली जाऊ लागली. मग बऱ्याचदा त्यांच्या नात्याबद्दल अनेक बातम्या समोर येऊ लागल्या, पण दोघांनीही कधीही त्यावर प्रतिक्रिया दिली नाही. गेल्या ३ वर्षांपासून हे दोघं एकमेकांना डेट करत असल्याचंही सांगण्यात येतं.

इतकंच नाही तर,जवळपास सहा महिन्यांपूर्वीपर्यंत, देवेराकोंडा आणि रश्मिका मंदान्ना एकाच ठिकाणचे फोटो शेअर केले होते. ज्यामुळे चाहत्यांना ही जोडी केवळ पडद्यावरच नाही तर प्रत्यक्ष आयुष्यातही खास असल्याची जाणीव होऊ लागली.

अनेकदा विजय आणि रश्मिका अनेकदा विमानतळावर, फॅमिली फंन्कशनमध्ये एकत्र दिसले. मात्र प्रत्येक वेळी त्यांनी आम्ही फक्त चांगले मित्र आहोत असंच सांगितलं होतं.

अलिकडेच त्यांच्या साखरपुड्याची बातमी आल्यानंतर विजयच्या हातात अंगठी दिसली होती. तसेच, रश्मिकाने स्वतः एक व्हिडीओ शेअर केला होता, ज्यामध्ये ती तिच्याही बोटात हिऱ्याची अंगठी दिसली होती. आता विजय-रश्मिका आयुष्यभराचे सोबती झाले आहेत.

















