'हे' दक्षिणात्य चित्रपट आणि वेबसीरिज चर्चेत, घरबसल्या मनोरंजनाचा फुल ऑन डोस!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 16:56 IST2025-08-05T16:48:46+5:302025-08-05T16:56:32+5:30

या आठवड्यात अ‍ॅक्शन, थ्रिल आणि ड्रामाचा तडका!

सध्या दक्षिणात्य (साऊथ) चित्रपटांची चलती आहे. हिंदीमध्ये डब केलेले दक्षिणात्य चित्रपट प्रेक्षक ओटीटी किंवा थिएटरमध्ये पाहात आहेत. दक्षिणात्य, म्हणजे तमिळ (तमिळनाडू), तेलुगू (आंध्र प्रदेश), कन्नड (कर्नाटक) आणि मल्याळम (केरळ) या भाषांत होणारे चित्रपट.

या आठवड्यात, अनेक सर्वोत्तम दक्षिणात्य चित्रपट आणि सीरिज ओटीटीवर प्रदर्शित होणार आहेत. जे तुम्ही घर बसल्या पाहू शकता.

समुद्रातील मच्छिमारांच्या जीवनावर आणि न्यायासाठीच्या त्यांच्या संघर्षावर आधारित 'अरेबिया कडाली' ८ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. ही वेबसीरिज Amazon Prime Video स्ट्रीम होणार आहे.

साउथ स्टार नितिनची 'थम्मुडु' (Thammudu) १ ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्सवर स्ट्रीम झाला आहे. या चित्रपटाची कथा एका भाऊ आणि बहिणीच्या नात्याभोवती फिरते.

'जिन: द पेट' (Jinn - The Pet) मध्ये तुम्हाला एका लहान कुटुंबाची कहाणी पाहायला मिळेल. हा चित्रपट २ ऑगस्ट रोजी सन NXT वर स्ट्रीम झाला आहे.

'सुरभिला सुंदर स्वप्नम' (Surabhila Sundara Swapnam) १ ऑगस्ट रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म सन NXT वर स्ट्रीम झाला आहे. हा मल्याळम चित्रपट टोनी मॅथ्यू यांनी लिहिलेला आणि दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात पॉल व्हीजी, वर्गीस, राजलक्ष्मी राजन आणि दयाना हमीद हे कलाकार महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसतील.

तेलुगू वेबसीरिज 'मायासभा: द राइज ऑफ टायटन्स' (Mayasabha: The Rise of the Titans) ७ ऑगस्ट रोजी सोनी लिव्हवर प्रदर्शित होणार आहे. हा एक रोमांचक तेलुगू राजकीय थ्रिलर चित्रपट आहे, जो वास्तविक जीवनातील घटनांपासून प्रेरित आहे. या सीरिजमध्ये चैतन्य राव, आधी, रवींद्र विजय, दिव्या दत्ता, शत्रू, नस्सर, साई कुमार आणि चरिता वर्मा दिसणार आहेत.

तमिळ अ‍ॅक्शन ड्रामा "Garudan" ३१ मे २०२४ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. आता हा चित्रपट सन NXT या OTT प्लॅटफॉर्मवर उपलब्ध झाला.या चित्रपटात उन्नी मुकुंदन, सशिकुमार आणि रोशनी हरिप्रियान मुख्य भूमिकेत आहेत.

'मायाकूथू' (Maayakoothu) हा २०२५ चा भारतीय तमिळ-भाषेतील क्राईम ड्रामा आहे. हा चित्रपट ८ ऑगस्ट रोजी सन NXT वर स्ट्रीम होईल. या चित्रपटाची कहानी जादुई शक्ती आणि गुन्ह्यांभोवती फिरते.