नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 13:49 IST2026-04-08T13:43:22+5:302026-04-08T13:49:25+5:30

साऊथ अभिनेत्री पूजिता जोनालगड्डा हिने तिच्या तिच्या पर्सनल आणि वैवाहिक आयुष्याबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. नवऱ्याच्या अफेअरमुळे अभिनेत्रीचा १४ वर्षांचा संसार मोडला आहे.

साऊथ अभिनेत्री पूजिता जोनालगड्डा हिने तिच्या तिच्या पर्सनल आणि वैवाहिक आयुष्याबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. नवऱ्याच्या अफेअरमुळे अभिनेत्रीचा १४ वर्षांचा संसार मोडला आहे.

पूजिताचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये तिने नवऱ्याच्या अफेअरबाबत धक्कादायक खुलासे केले आहेत.

पूजिताने आरोप केला आहे की तिचा नवरा विजय गोपालचे ९ महिलांसोबत अनैतिक संबंध होते. "एका पत्नीसाठी याच्यापेक्षा वाईट गोष्ट काय असू शकते? जिने पतीला १४ वर्ष साथ दिली. मात्र त्याने एवढा मोठा धोका दिला", असं पूजिता म्हणाली.

जेव्हा माझा मुलगा ७ वर्षांचा होता. तेव्हाच विजयने आम्हाला सोडून दुसरं लग्न केलं होतं, असंही पूजिताने सांगितलं.

एवढंच नव्हे तर नवऱ्याने घरातून तब्बल २.५ कोटींचं सोनंही चोरल्याचा आरोप पूजिताने केला आहे.

आता पूजिता सिंगल मदर असून मुलाचा एकटीने सांभाळ करत आहे. पण, कधीही चुकीचा रस्ता निवडणार नसल्याचं तिने म्हटलं आहे.

पूजिताने ७० हून अधिक तेलुगु सिनेमांमध्ये काम केलं आहे. याशिवाय तिने तमिळ, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्येही काम केलं आहे.

पूजिताला दिल पेला मुद्दुला पुलिस या सिनेमामुळे प्रसिद्धी मिळाली. या सिनेमात तिने दुसऱ्या पत्नीची भूमिका साकारली होती.

मात्र आपल्या खऱ्या आयुष्यातही असंच काहीतरी घडेल, असं तिला स्वप्नातही वाटलं नव्हतं.