रश्मिकाचा झालेला साखरपुडा, पण मोडलं लग्न; १३ वर्ष मोठ्या अभिनेत्याच्या प्रेमात होती 'श्रीवल्ली'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2026 15:33 IST2026-02-23T14:42:50+5:302026-02-23T15:33:34+5:30

साखरपुडा झाला, पण लग्नापर्यंत नातं पोहोचलंच नाही; कारण...

गीता गोविंदम' ते 'पुष्पा' अशा सिनेमांमुळे 'नॅशनल क्रश' बनलेली अभिनेत्री रश्मिका मंदाना लग्नबंधनात अडकणार आहे. अभिनेता विजय देवरकोंडासोबत २६ फेब्रुवारी रोजी ती सातफेरे घेणार आहे.

विजय आणि रश्मिका गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. व्हेकेशन असो किंवा गुपचूप डिनर/कॉफी डेट असो दोघांना अनेकदा चाहत्यांनी पकडलं आहे.

गेल्या वर्षीपासूनच त्यांच्या लग्नाच्या चर्चांना जोर आला होता. फेब्रुवारी २०२६ मध्ये ते लग्न करतील असं व्हायरलही झालं होतं. मात्र कधीच दोघांनी त्यावर भाष्य केलं नव्हतं.

आता नुकतंच त्यांनी इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत प्रेमाची कबुली दिली आहे. त्यांच्या लग्नाचा हॅशटॅग हा चाहत्यांनीच त्यांना प्रेमाने दिलेलं नाव 'विरोश' हाच असणार आहे असं त्यांनी म्हटलं. यामुळे चाहत्यांचा आनंद तर गगनात मावेना झाला आहे.

पण तुम्हाला माहितीये का काही वर्षांपूर्वी रश्मिकाचा साखरपुडा झाला होता. १३ वर्ष मोठ्या अभिनेत्याच्या ती प्रेमात होती. मात्र त्यांचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही.

तो आहे साउथचा प्रसिद्ध अभिनेता रक्षित शेट्टी. २०१७ साली रश्मिकाने रक्षितसोबत साखरपुडा केला होता. तेव्हा ती फक्त २१ वर्षांची होती तर रक्षित ३४ वर्षांचा होता.

रश्मिकाने आपल्या पहिल्या सिनेमात रक्षितसोबत काम केलं होतं. 'किरिक पार्टी' असं सिनेमाचं नाव होतं. तेव्हाच ते प्रेमात पडले आणि लगेच साखरपुडाही केला.

मात्र लग्न करण्याच्या आधीच त्यांच्यात करिअर आणि इतर गोष्टींवरुन मतभेद झाले आणि दोघांनी वेगवेगळे मार्ग निवडले. रक्षित ४२ वर्षांचा असून आजपर्यंत त्याने लग्नच केलेलं नाही तर रश्मिका आता वयाच्या २९ व्या वर्षी लग्नबंधनात अडकत आहे.