'सिकंदर' प्रदर्शित होताच रश्मिका मंदानाची लंच डेट, लपूनछपून पोहोचला विजय देवरकोंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 10:16 IST2025-03-31T09:58:13+5:302025-03-31T10:16:14+5:30

पुन्हा एकदा रश्मिका आणि विजयच्या अफेअरची चर्चा रंगली आ

अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) हिला कुठल्या परिचयाची गरज नाही. खूपच कमी वयात तिनं मोठ यश मिळवलं आहे.

नुकतंच तिचा 'सिकंदर' (Sikandar) हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. 'सिकंदर'मध्ये रश्मिकानं थेट बॉलिवूडचा भाईजान सलमान खानसोबत (Salman Khan) रोमान्स केलाय.

काल 'सिकंदर' चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर रश्मिका ही कथित बॉयफ्रेंड विजय देवरकोंडाबरोबर (Vijay Deverakonda)पाहायला मिळाली. दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

विजय आणि रश्मिका हे मुंबईतील एका रेस्टॉरंटच्या बाहेर स्पॉट (Rashmika Mandanna Lunch Date With Vijay Deverakonda )झाले. पण, दोघांनी पापाराझींना एकत्र पोझ दिली नाही.

रश्मिका मंदान्ना कॅज्युअल लूकमध्ये होती. क्रॉप टॉप आणि जीन्समध्ये रश्मिका पाहायला मिळाली. तिनेही आधी मास्क घातलेला होता. पण, पॅप्सला पोझ देताना तिनं मास्क काढला.

यावेळी विजय देवरकोंडा कूल लूकमध्ये दिसला. पांढऱ्या शर्टसोबत मॅचिंग पॅन्ट त्यानं परिधान केली होती. पण, त्याने मास्कने चेहरा लपवलेला होता.

रश्मिका आणि विजयचे हे फोटो व्हायरल होत आहेत. रश्मिका व विजय नेहमी एकमेकांबरोबर क्वालिटी टाइम स्पेंड करत असतात.

रश्मिका आणि विजय देवरकोंडा कधी मालदीव व्हॅकेशनला जातात तर कधी डिनर डेटवर असतात. दोघंही वेगवेगळे फोटो पोस्ट करतात मात्र चाहते ते एकत्र असल्याचं शोधून काढतात.

रश्मिका आणि विजय यांनी 'गीता गोविंदम', 'डिअर कॉम्रेड' या सिनेमांमध्ये काम केलं आहे. तेव्हापासून दोघांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडते.

हे जोडपं लवकरच लग्न करणार असल्याचं बोललं जात आहे. दोघे कधी जाहीरपणे प्रेमाची कबुली देतात या क्षणाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.