श्रीमंतीच्या बाबतीत विजय देवराकोंडाच्या तोडीस तोड आहे रश्मिका मंदाना, एका सिनेमासाठी घेते तब्बल 'इतके' पैसे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 13:20 IST2026-02-25T13:15:05+5:302026-02-25T13:20:37+5:30

रश्मिका-विजय हे दोघेही साऊथमधील लोकप्रिय स्टार आहेत. संपत्तीच्या बाबतीतही ते एकमेकांना तोडीस तोड आहेत.

साऊथ सिनेसृष्टीतील लोकप्रिय कपल असलेले रश्मिका मंदाना आणि विजय देवराकोंडा लग्नाच्या बेडीत अडकत आहेत. रश्मिका-विजयने काही महिन्यांपूर्वीच गुपचूप साखरपुडा केला.

तेव्हापासूनच त्यांच्या लग्नाची चर्चा सुरू होती. अखेर सोशल मीडियावर पोस्ट करत रश्मिका-विजयने प्रेमाची कबुली दिली आहे. २६ फेब्रुवारीला ते दोघेही लग्नगाठ बांधणार आहेत.

रश्मिका-विजय हे दोघेही साऊथमधील लोकप्रिय स्टार आहेत. संपत्तीच्या बाबतीतही ते एकमेकांना तोडीस तोड आहेत.

विजय देवराकोंडाची एकूण संपत्ती ही जवळपास ६६ ते ७० कोटींच्या आसपास आहे. तर अभिनेता एका सिनेमासाठी १२ ते १५ कोटी इतकी फी घेतो.

ब्रँड अॅडरोसमेंटसाठी विजय देवराकोंडा जवळपास १ कोटी रुपये मानधन घेतो. तर एका इन्स्टाग्राम पोस्टसाठी त्याला ४० लाख रुपये मिळतात.

श्रीमंती आणि कमाईच्या बाबतीत रश्मिका मंदानाही काही कमी नाही. ती विजयला तोडीस तोड आहे.

रश्मिकादेखील एका सिनेमासाठी ४ ते ८ कोटी इतकं मानधन घेते. जाहिरातींमधूनही ती लाखो रुपये कमवते.

रश्मिका ६६ कोटींची मालकीण आहे. तिचं बंगळुरूमध्ये स्वत:चं घर आहे. याशिवाय अनेक महागड्या गाड्याही तिच्याकडे आहेत.