एखाद्या राजवाड्यापेक्षा कमी नाही राम चरणचं घर, फोटो पाहिलेत का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 18:10 IST2025-08-11T17:42:49+5:302025-08-11T18:10:24+5:30

चला पाहूया आलिशान अशा राजवाड्यासारख्या दिसणाऱ्या घराचे काही फोटो

सुपरस्टार रामचरण तेजा (Ramcharan Teja) याने उत्तम अभिनयशैलीच्या जोरावर संपूर्ण जगभरात लोकप्रियता मिळवली आहे.

अभिनय आणि लोकप्रियतेबरोबरच, त्याची लाइफस्टाइलही चाहत्यांच्या चर्चेचा विषय ठरते.

रामचरण तेजा हैदराबादमधील कोनिडेला हाऊसमध्ये राहतो. त्याचा हा बंगला पंचतारांकित हॉटेलपेक्षा कमी नाही.येथे राम चरण त्याच्या पत्नी, मुले आणि कुटुंबातील इतर सदस्यांसह राहतो.

अलिकडेच कर्ली टेल्सला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्याची पत्नी उपासना कोनिडेला हिने त्यांच्या आलिशान घराचा प्रत्येक कोपरा दाखवला.

हे घर केवळ आकाराने भव्य नसून, त्याच्या डिझाइनमध्ये अँटीक टच आणि आधुनिक इंटीरियरचा अनोखा संगम पाहायला मिळतो.

आरामदायी फर्निचरमुळे घरात बसूनही बाहेरील दृश्यांचा आनंद घेता येतो.

घराभोवती झाडे आणि वनस्पतींनी वेढलेली हिरवळ आहे, जी संपूर्ण परिसराला नैसर्गिक सौंदर्य देते.

राम चरणची पत्नी उपासना ही एक यशस्वी व्यावसायिक आहे. ती अपोलो हॉस्पिटल्स समूहाचा एक भाग आहे.

राम चरणचे कुटुंब टॉलिवूडमधील सर्वात प्रिय कुटुंबांपैकी एक आहे.

राम चरण याचे फक्त फिल्म इंडस्ट्रीमध्येच नाही तर उद्योजक जगतातही मोठं नाव आहे. तो तब्बल १३७० कोटींचा मालक आहे.