५० व्या वर्षी दुसऱ्यांदा बोहल्यावर चढला लोकप्रिय गायक, १६ वर्षांनी लहान आहे पत्नी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 12:40 IST2025-10-27T12:20:46+5:302025-10-27T12:40:02+5:30

१६ वर्षांनी लहान गायिकेसोबत संगीतकारानं केलं लग्न, पहिल्या पत्नीनं केले होते लैंगिक छळाचे आरोप

गायक-संगीतकार रघु दीक्षित (Raghu Dixit) याने गायिका वरिजाश्री वेणुगोपाल (Varijashree Venugopal) हिच्याशी लग्नगाठ बांधली आहे.

रघु आणि वरिजाश्री यांनी आपल्या लग्नाचा एक सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

त्यांनी फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये लिहलं, "आनंद आणि एकत्र वाटचाल करण्याच्या दिशेने! आमच्या वडीलधाऱ्यांचे, कुटुंबियांचे आणि प्रियजनांच्या आशीर्वादासह या नव्या प्रवासाची सुरुवात करण्यासाठी आम्ही कृतज्ञ आहोत".

रघु आणि वरिजाश्री यांच्या लग्नाला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती, ज्यात अभिनेत्री यमुना श्रीनिधि यांचाही समावेश होता. यमुना यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर लग्नाचे काही खास क्षण शेअर केले आहेत.

रघु आणि वरिजाश्री यांच्या नात्याची सुरुवात मैत्रीतून झाली. या वर्षी फेब्रुवारीमध्ये रघु दीक्षितने वरिजाश्रीचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता आणि तिच्या ग्रॅमी नामांकनाबद्दल तिचे कौतुक केले होते

हळूहळू ही मैत्री आता प्रेम आणि लग्नाच्या नात्यात बदलली आहे. आता दोघांनी त्यांच्या आयुष्यातील नव्या पर्वाला सुरुवात केली आहे.

रघु दीक्षित आणि वरिजाश्री वेणुगोपाल यांच्या वयाबद्दल सांगायचं झालं तर, त्यांच्या वयामध्ये साधारण १६ वर्षांचं अंतर आहे. रघु दीक्षित यांचं वय ५० वर्ष आहेतर वरिजाश्री ३४ वर्षांची आहे. रघु दीक्षितपेक्षा पत्नी वरिजाश्री वेणुगोपाल ही १६ वर्षांनी लहान आहे.

रघु दीक्षित यांचे हे दुसरे लग्न आहे. यापूर्वी २००५ मध्ये त्यांचे लग्न कोरिओग्राफर आणि नृत्यांगना मयुरी उपाध्याय यांच्याशी झाले होते. २०१६ पासून ते वेगळे राहत होते आणि २०१९ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.

या घटस्फोटादरम्यान, गायिका चिन्मयी श्रीपादा यांनी रघु दीक्षित यांच्यावर लैंगिक छळाचा (Sexual Harassment) आरोप केला होता, ज्यानंतर मयुरी उपाध्याय यांनीही रघुवर कठोर कारवाईची मागणी केली होती.

आता रघु यांची दुसरी पत्नी वरिजाश्री वेणुगोपाल स्वतः एक लोकप्रिय गायिका आणि संगीत शिक्षिका आहे. वरिजाश्री वेणुगोपाल ही एक ग्रॅमी नामांकित आहे. 2024 मध्ये तिला जेकब कॉलियर आणि अनुष्का शंकर यांच्यासोबत अ रॉक समहेअर या कामासाठी तिचे पहिले ग्रॅमी नामांकन मिळाले होते.