नजरेच्या बाणानं घायाळ करणाऱ्या 'प्रिया वॉरियर'च्या साडीतील लूकवरून तुमचीही नजर हटणार नाही; पाहा फोटो….

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2024 05:27 PM2024-05-13T17:27:42+5:302024-05-13T18:19:35+5:30

नजरेच्या बाणानं घायाळ करून तरुणांचा 'कलिजा खल्लास' करणारी अभिनेत्री म्हणजे प्रिया प्रकाश वॉरियर.

'ओरु अदार लव्ह’ या मल्याळम चित्रपटातील एक सीन चर्चेत काय आला अन् प्रिया प्रकाश वॉरियरचं नशिब चमकलं. आपल्या अनोख्या स्टाईलमुळे रातोरात जगभर प्रसिद्ध झालेल्या या अभिनेत्रीला 'विंक गर्ल' ही म्हटलं जातं.

प्रिया जितकी सुंदर वेस्टर्न लूकमध्ये दिसते, तितकीच ती भारतीय कपड्यांमध्येही सुंदर दिसते.

प्रियामध्ये साडीचं क्रेझ पाहायला मिळतं. अनेकदा ती साडीमधील फोटो शेअर करते. साडीतील खास लूकमध्ये प्रिया खूपच भारी दिसते आहे.

फ्लॉवर प्रिंट साडीमध्ये प्रियानं एकापेक्षा एक पोज दिल्या आहेत. प्रियानं साडीवर मॅच होतील असे झुमके परिधान केले आणि सिंपल साडीला सुद्धा स्टायलिश लुक दिला आहे.

साडीमध्ये प्रिया हिचा लूक फुलून दिसत आहे. तिचे हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत.

सर्वांना वेड लावणारी प्रिया प्रकाश ही एक उत्तम अभिनेत्री आहेच. पण तितकीच उत्तम सिंगरही आहे. होय, स्वत:च्या युट्युब चॅनलवर व इन्स्टाग्रामवर ती अनेकदा सिंगींग व्हिडीओ शेअर करत असते.

प्रियाला कोणत्याही ओळखीची गरज नाही. तिचं स्मित हास्य चाहत्यांच्या मनावर वेगळीच छाप पाडते.

प्रिया सोशल मीडियावर कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत प्रिया चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

चाहते देखील अभिनेत्रीच्या प्रत्येक फोटो आणि व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करतात.

प्रियाचे इंस्टाग्रामवर जबरदस्त फॅन फॉलोअर्स आहेत, इंस्टाग्रामवर तिचे 7.6 मिलियन फॉलोअर्स आहेत.