विवाहित प्रभूदेवाच्या प्रेमात आकंठ बुडाली होती 'नयनतारा', लग्नही करणार होते पण....

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2023 11:20 AM2023-11-17T11:20:14+5:302023-11-17T12:50:04+5:30

एकेकाळी प्रभूदेवा आणि नयनतारा एकमेकांवर जीवापाड प्रेम करायचे. दोघेही लग्नही करणार होते. पण अचानक दोघे वेगळे झाले.

साउथ फिल्म इंडस्ट्रीतील सर्वात यशस्वी अभिनेत्रींपैकी एक आहे नयनतारा. आज तिने तिची वेगळी ओळख तयार केली आहे. नयनताराने अनेक सुपरहिट सिनेमे दिले आहे. शाहरुख खानच्या जवान सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला.

नयनताराने आयुष्यात खूप यश मिळवलं, पण ती नेहमीच तिच्या लव्ह लाइफमुळे जास्त चर्चेत राहिली. नयनताराला दक्षिणेतील लेडी सुपरस्टार मानलं जातं. आणि हा टॅग तिला प्रभूदेवाने दिला होता. एकेकाळी प्रभूदेवा आणि नयनतारा एकमेकांवर जीवापाड प्रेम करायचे. दोघेही लग्नही करणार होते. पण अचानक दोघे वेगळे झाले. चला जाणून घेऊ कारण....

नयनताराचा जन्म १८ नोव्हेंर १९८४ मध्ये बंगळुरूमध्ये एका मल्याळम ख्रिश्चन कुटुंबात झाला होता. तिचं खरं नाव डायना मरियम कुरियन आहे. तिचे वडील वायुसेनेत अधिकारी होते. त्यामुळे ती बालपणापासून वेगवेगळ्या शहरांमध्ये फिरली. तिचं शिक्षण चेन्नई, दिल्ली, गुजरात आणि थिरूवला इथे झालं. नयनताराने कॉलेजला असताना मॉडलिंगच्या विश्वात पाऊल ठेवलं होतं.

नयनताराने अभिनयाची सुरूवात मल्याळम सिनेमा 'मनासिनकारे'तून केली होती. यात नयनतारासोबत जयराम दिसला होता. त्यानंतर २००५ मध्ये तिने 'अय्या' सिनेमातून तमिळ सिनेमात एन्ट्री घेतली आणि नंतर लक्ष्मी सिनेमातून ती तेलुगू इंडस्ट्रीत गेली. तिचा सर्वात हिट सिनेमा चंद्रमुखी आहे. यात तिच्यासोबत रजनीकांत होता.

नयनतारा आणि प्रभूदेवाचं नातं Villu सिनेमाच्या सेटवरून सुरू झालं होतं. या सिनेमात नयनतारा मुख्य अभिनेत्री होती. तर प्रभूदेवा या सिनेमाचा दिग्दर्शक होता. नयनतारा त्या काळात सिंगल होती, पण प्रभूदेवा विवाहित होता. दोघे बराच काळ एकमेकांना डेट करत होते. दावा केला जातो की, दोघे बराच काळ लिव इनमध्ये होते. दोघांना लग्नही करायचं होतं. पण प्रभूदेवाची पत्नी राम असं होऊ दिलं नाही.

प्रभूदेवा आणि नयनतारा यांच्या लव्हस्टोरीची चर्चा वाढतच चालली होती. विवाहित प्रभूदेवा नंतर नयनतारासह लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागल्याचीही बातमी वाऱ्यासारखी पसरली. त्याची पत्नी रामलताला हे समजलं. प्रभूदेवाने तिच्याकडे घटस्फोटाची मागणी केली. मात्र रामलताने त्याला सरळ नकार दिला.

असं म्हणतात नयनताराने स्वत: रामलताला लाच देण्याचाही प्रयत्न केला. तिला वाटले रामलता स्वत:हून प्रभूदेवाला सोडेल मात्र असं झालं नाही. अखेर 2010 मध्ये रामलताने प्रकरण कौटुंबिक न्यायालयात नेलं. प्रभूदेवाच्या लिव्ह इन रिलेशनशिपविषयीही माहिती दिली.

2011 साली मात्र दोघांचा घटस्फोट झाला. यानंतर नयनतारा आणि प्रभूदेवाचंही नातं टिकलं नाहीच. त्यामुळे प्रभूदेवा एकटा पडला. अशा प्रकारे नयनतारा आणि प्रभूदेवाची लव्हस्टोरी अपूर्णच राहिली.

दुसरीकडे नयनताराने दिग्दर्शक विग्नेश शिवनशी लग्न केले. तिने सरोगसीच्या माध्यमातून जुळ्या मुलांना जन्म दिला.