अभिनेत्रीनं उद्योगपतीसोबत पारंपरिक पद्धतीने बांधली लग्नगाठ, पाहा वेडिंग अल्बम

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 16:00 IST2025-02-13T15:07:35+5:302025-02-13T16:00:35+5:30

'द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम' (GOAT) मध्ये महत्त्वाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री पार्वती नायरने लग्नगाठ बांधली आहे.

तिने लग्नातील फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. फोटोंमध्ये दोघेही खूपच सुंदर दिसत आहे.

पार्वतीने मोठ्या थाटामाटात १० फेब्रुवारी रोजी उद्योगपती आश्रित अशोकबरोबर ( Parvati Nair Marries Aashrith Ashok) लग्न केलं.

तिरुवनमीयूर येथे पारंपारिक दक्षिणात्य पद्धतीने हा विवाहसोहळा पार पडला.

पार्वतीने आयुष्यातील या खास दिवसासाठी सोनेरी रंगाची सुंदर कांजीवरम साडी नेसली होती. ती वधूच्या रूपात खूपच सुंदर दिसत होती.

पार्वतीचा पती आश्रितने त्याच रंगाचा कुर्ता आणि धोतर असा पारंपरिक लूक केला होता.

अभिनेत्री लग्नाच्या प्रत्येक विधींचा आनंद घेताना दिसली. दोघांनी एकमेंकाच्या गळ्यात फुलांची माळ घातली.

सध्या पार्वती नायर आणि आश्रितवर चाहत्यांकडून आणि कलाकारांकडून प्रेमाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

पार्वती नायर आणि आश्रित यांचं एकमेकांवर प्रचंड प्रेम आहे. ते कायम एकमेंकावर प्रेम व्यक्त करताना दिसून आले आहेत.

दरम्यान, पार्वती व आश्रित यांनी काही दिवसांपुर्वीच एका खासगी सोहळ्यात साखरपुडा उरकला होता.