जाळ आणि धूर संगटच... श्रीलीलाच्या हॉट अदा पाहून चाहते फिदा, फोटोंवरुन हटणार नाही तुमची नजर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2024 06:13 PM2024-05-21T18:13:17+5:302024-05-21T18:19:55+5:30

अभिनेत्री श्रीलीला ही दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे.

अलिकडे ती महेश बाबूच्या गुंटूर कारम (Guntu Kaaram Movie) चित्रपटात झळकली होती. या सिनेमाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

यातच आता श्रीलीलाने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतल्याचे दिसून आले आहे.

तिने काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

एकापेक्षा एक पोज देत तिनं चाहत्यांना घायाळ केलं. डेनिम ड्रेसमध्ये श्रीलीला खूपच हॉट दिसत आहे.

सध्या श्रीलीलाचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

चाहते देखील अभिनेत्रीचे फोटो पाहून लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

श्रीलीला इतकी सुंदर दिसतेय की तिच्यावरून नजर हटवणे कठीणच.

अमेरिकेत जन्मलेली श्रीलीला ही बंगळुरू येथील एका प्रख्यात उद्योगपतीची मुलगी आहे.

श्रीलीलाने २०१९मध्ये 'किस' सिनेमातून डेब्यू केला होता. ऐवढंच नाही तर 22 वर्षांच्या श्रीलीलाने फेब्रुवारी २०२२मध्ये दोन अपंग मुले दत्तक घेतल्याची माहिती आहे.