'बाहुबली' फेम प्रभास-अनुष्का शेट्टी अडकले लग्नबेडीत? फोटो होतायेत व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2023 10:43 AM2023-10-11T10:43:57+5:302023-10-11T10:47:48+5:30

Prabhas - Anushka Shetty : दाक्षिणात्य अभिनेता प्रभास आणि अनुष्का शेट्टी बाहुबली आणि बाहुबली २मध्ये झळकले होते. या चित्रपटातील त्यांची केमिस्ट्री चाहत्यांना खूपच भावली आहे. त्यामुळे त्यांचे चाहते खऱ्या आयुष्यातही त्यांना एकत्र पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

दाक्षिणात्य अभिनेता प्रभास आणि अनुष्का शेट्टी बाहुबली आणि बाहुबली २मध्ये झळकले होते. या चित्रपटातील त्यांची केमिस्ट्री चाहत्यांना खूपच भावली आहे. त्यामुळे त्यांचे चाहते खऱ्या आयुष्यातही त्यांना एकत्र पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

दरम्यान आता त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा त्यांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आले आहे. खरेतर हे AI ने चाहत्यांची इच्छा पूर्ण करत त्या दोघांच्या लग्नाचे फोटो तयार केले आहेत.

सध्या सोशल मीडियावर प्रभास आणि अनुष्का शेट्टीचे AI जेनरेटेड फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोत ते दोघे विवाहित जोडप्यांसारखे दिसत आहेत.

प्रभास आणि अनुष्का शेट्टी अनेकदा इंटरव्ह्यूत सांगताना दिसतात की ते दोघे एकमेकांच्या खूप जवळ आहेत. ते दोघे एकमेकांच्या सुख दुःखात एकत्र असतात. मात्र आता AI ने त्यांचे लग्न लावून दिले आहे.

सोशल मीडियावर बाहुबली फेम अभिनेता प्रभास आणि अनुष्का शेट्टी वर वधूच्या गेटअपमध्ये दिसत आहेत. लग्नाच्या गेटअपमध्ये ते खूप सुंदर दिसत आहेत.

AI ने फक्त कपलचे लग्नच लावले नाही तर त्यांना एक मुलगी असल्याचेही दाखवले आहे. त्या लहान गोंडस मुलीसोबत अनुष्का शेट्टी आणि प्रभास खूपच क्युट दिसत आहे.

हे कपल किचनमध्ये काही रोमँटिक क्षण एकत्र व्यतित करताना दिसत आहे. त्यांच्या या फोटोंना सोशल मीडियावर चाहत्यांचे खूप प्रेम मिळत आहे.

वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर प्रभास लवकरच सालार चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत दीपिका पादुकोण दिसणार आहे.