'या' मराठमोळ्या अभिनेत्रीची ॲटलीच्या सिनेमात एन्ट्री, अल्लू अर्जुनसोबत करणार स्क्रीन शेअर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 13:19 IST2025-07-10T13:11:53+5:302025-07-10T13:19:19+5:30
ती मराठमोळी अभिनेत्री कोण?

दक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि ब्लॉकबस्टर दिग्दर्शक ॲटली कुमार (Atlee Kumar) यांचा आगामी साय-फाय अॅक्शन थ्रिलर 'AA22xA6' सध्या चर्चेत आहे.
अल्लू अर्जुन-अॅटली यांच्या आगामी चित्रपटाच्या पटकथेचं हॉलिवूडमधील काही प्रसिद्ध तज्ञांनी कौतुक केलं आहे. हा एक भव्य चित्रपट असणार आहे.
या सिनेमात एक दोन नाही तर तब्बल पाच अभिनेत्री असणार आहेत. मीडिया रिपोर्टनुसार सर्वात पहिल्यांदा या सिनेमासाठी अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) हिच्या नावावर शिक्कामोर्तब झालं.
दीपिका पदुकोणनंतर या चित्रपटात रश्मिका मंदानाची (Rashmika Mandana) एन्ट्री झाली. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्नाची जोडी यापूर्वी 'पुष्पा' चित्रपटात दिसली होती. चाहत्यांना ही जोडी खूप आवडली.
दीपिका पदुकोण आणि रश्मिकानंतर समांथाच्या (Samantha Ruth Prabhu) नावाचीही चर्चा सुरू असल्याची माहिती आहे. तर यासोबतच जान्हवी कपूरला (Janhvi Kapoor) हिचीदेखील या चित्रपटासाठी निवड करण्यात आली आहे.
दीपिका पदुकोण, जान्हवी कपूर, रश्मिका मंदाना आणि समांथा रूथ प्रभू या स्टारकास्टमध्ये मराठमोळ्या लोकप्रिय चेहऱ्याची भर पडली आहे. जी थेट अल्लू अर्जुनसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.
अल्लू अर्जुन-अॅटली यांच्या बिग बजेट चित्रपटात एका मराठमोळ्या अभिनेत्रीचाही (Allu Arjun Atlee Kumar Aa22xa6 Marathi Actress Cast) समावेश झाल्याने मराठी प्रेक्षकांमध्येही उत्सुकता निर्माण झाली आहे.
तर ती अभिनेत्री आहे मृणाल ठाकूर (Mrunal Thakur). जानेवारीमध्ये लूक‑टेस्टद्वारे तिची निवड झाल्याचं बोललं जात आहे. ही एक प्रतिभावान अभिनेत्री आहे, जिने मराठी, हिंदी आणि तेलुगू चित्रपटसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
मृणाल ही मुळची महाराष्ट्रातील धुळ्याची आहे. पण तिने तिच्या अभिनयाच्या जोरावर संपूर्ण देशात वेगळं वलय निर्माण केलंय.
दरम्यान आतापर्यंत फक्त दीपिकाची 'AA22xA6'साठी निवड झाल्याचं अधिकृत जाहिर करण्यात आलं होतं. निर्मात्यांनी अद्याप इतर कोणत्याही अभिनेत्रीबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.