PHOTO: तेरी झलक अशरफी श्रीवल्ली! रश्मिकाच्या मनमोहक अदा पाहून चाहते घायाळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2024 13:56 IST2024-11-28T13:46:21+5:302024-11-28T13:56:19+5:30
दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदानाचे जगभर चाहते आहेत.

सध्या अभिनेत्री तिचा आगामी चित्रपट 'पुष्पा-२ मुळे प्रसिद्धीझोतात आली आहे.
रश्मिका मंदाना तिच्या अभिनयासह फॅशनसेन्समुळे लाइमलाईटमध्ये येते.
नुकतेच तिने लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
पिवळ्या रंगाची साडी त्यावर स्लिव्हलेस ब्लाऊज तसेच खड्यांचा नेकलेस घालून तिने लूक पूर्ण केला आहे.
या फोटोंमध्ये रश्मिकाने केस मोकळे सोडल्यामुळे तिचं सौंदर्य आणखी खुलून आलंय.
अभिनेत्री रश्मिका मंदानाचे हे फोटो पाहून नेटकरी घायाळ झाले आहेत.
शिवाय तिच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.