Samantha Ruth Prabhu : फक्त एक इन्स्टा पोस्ट आणि ‘साऊथ क्वीन’ सामंथा रूथ प्रभू कमावते ‘इतके’ कोटी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2022 11:22 IST2022-06-10T11:10:34+5:302022-06-10T11:22:08+5:30

Samantha Ruth Prabhu : साऊथ चित्रपटसृष्टीतील सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत सामंथा दुसऱ्या क्रमांकावर आहे. सामंथा आपल्या एका इन्स्टाग्राम पोस्टमधूनही कोट्यावधी रुपये कमावते.

सामंथा रूथ प्रभू ही साऊथची मोठी अभिनेत्री. केवळ तेलगू इंडस्ट्रीतच नाही तर जगभरात तिचे चाहते आहेत. तिची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही.

सामंथाकडे अनेक मोठे सिनेमे आहेत. डिजिटली अनेक मोठे प्रोजेक्ट ती करणार आहे. इतकंच नाही, एका हॉलिवूड सिनेमातही तिची वर्णी लागली आहे.

पण सामंथा केवळ चित्रपटांसाठी लोकप्रिय नाही तर ब्रँड प्रमोशनमध्येही ती अव्वल आहे. ब्रँड प्रमोशनसाठी सामंथा कोट्यावधी रूपये घेते.

सोशल मीडियावर अनेकदा सामंथा ब्रँडचं प्रमोशन करताना दिसते. अलीकडे तिनं एका बिकिनीचं प्रमोशन केलं होतं. या प्रमोशनसाठी सामंथानं कोट्यावधी रूपये वसूल केलेत.

होय, आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या ब्रँडचे फोटो पोस्ट करून प्रमोशन करण्यासाठी 2 ते 3 कोटी रूपये घेतले. सामंथा महिन्यात अशा दोन ते तीन बँडचं प्रमोशन करते.

अलीकडे बरबेरी नावाच्या एक बॅगच्या ब्रँडचं तिने प्रमोशन केलं होतं. यासाठीही तिने तगडी रक्कम वसूल केली होती. केवळ चित्रपटांतून नाही तर अशा प्रमोशनमधूनही ती महिन्याला करोडींची कमाई करते.

इन्स्टाग्रामवर सामंथाचे 23.9 मिलियन फॉलोअर्स आहेत. तर ट्विटरवर 9.8 मिलियन लोक तिला फॉलो करतात. यावरून सामंथा किती लोकप्रिय आहे, याचा अंदाज येतो.

वर्कफ्रंटबद्दल बोलाल तर लवकरच तिचा ‘काथू वाकूला काढई’ हा सिनेमा रिलीज होणार आहे. ‘शकुनंतलम’ या चित्रपटाचं लवकरच ती शूटींग सुरू करणार आहे.

लवकरच तिचा तेलगू सिनेमाही रिलीज होणार आहे. विजय देवरकोंडाच्या ‘Kushi’ या चित्रपटातही ती झळकणार आहे.