PICS : नागा चैतन्य हिच्या प्रेमात? एक्स-वाईफ सामंथाइतकीच सुंदर आहे शोभिता धुलिपाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2022 14:39 IST2022-06-21T14:28:58+5:302022-06-21T14:39:13+5:30

Naga Chaitnya's rumored girlfriend Sobhita Dhulipala : सामंथाशी घटस्फोटानंतर पुन्हा एकदा प्रेमात पडलाय नागा चैतन्य? शोभिता धुलिपालाशी जोडलं जातंय नाव...

साऊथची लोकप्रिय अभिनेत्री सामंथा रूथ प्रभु हिच्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर साऊथ सुपरस्टार नागा चैतन्य प्रचंड चर्चेत आला होता. आता तो पुन्हा चर्चेत आला आहे.

रिपोर्टनुसार, सामंथाशी घटस्फोटानंतर नागा चैतन्य पुन्हा प्रेमात पडला आहे. ‘मेड इन हेवन’ फेम अभिनेत्री शोभिता धुलिपालाला तो डेट करत असल्याची चर्चा आहे.

गेल्या काही दिवसांपासून नागा चैतन्य व शोभ धुलिपाला सर्रास एकत्र दिसत आहेत. नागाने अलीकडे हैदराबादेत घर घेतलं, तेथे सध्या काम सुरू आहे. नागा व शोभिता अनेकदा या घराच्या फेरफटका मारताना दिसले.

अलीकडे मेजर या सिनेमाच्या प्रमोशनसाठी शोभिता ज्या हॉटेलमध्ये थांबली होती, त्या हॉटेलमध्ये नागा चैतन्य अनेकदा दिसला. यावरून दोघांच्या अफेअरच्या चर्चांना बळ मिळालं आहे.

आता ही शोभिता कोण तर ती एक लोकप्रिय मॉडेल व अभिनेत्री आहे. मेड इन हेवन या सुपरहिट वेब शोमध्ये ती दिसली होती. अलीकडे महेशबाबूच्या मेजर या चित्रपटात ती दिसली होती.

शोभिता नागा चैतन्यची एक्स वाईफ सामंथा रूथ प्रभुपेक्षा सौंदर्यात कमी नाही. 2013 मध्ये तिने फेमिना मिस इंडिया खिताब जिंकला होता.

शोभिता तिच्या बोल्ड अंदाजासाठी ओळखली जाते. बोल्डेनेसच्या बाबतीत ती कुणापेक्षाही कमी नाही.

शोभिता हिंदी, मल्याळम, तेलगू चित्रपटात काम करते. सोशल मीडियावर ती सतत स्वत:चे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.

शोभिताने अनुराग कश्यपच्या ‘रमन राघव 2.0’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. कालकांडी आणि शेफ या सिनेमातही ती दिसली.

नागा आणि सामंथा यांनी 2017 मध्ये लग्नगाठ बांधली होती. लग्नाच्या चौथ्या वाढदिवसाच्या काही दिवस आधी दोघांनी घटस्फोटाची घोषणा केली होती.