Shweta Tiwari : वयाच्या ४२व्या वर्षी श्वेता तिवारी तिसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात?, फोटो होतोय व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2023 17:18 IST2023-03-16T16:57:35+5:302023-03-16T17:18:33+5:30
Shweta Tiwari: सध्या श्वेता तिवारीच्या तिसऱ्या लग्नाची सध्या चर्चा होताना दिसते आहे.

अभिनेत्री श्वेता तिवारी आज कोणत्याही परिचयाची गरज नाही. वयाच्या ४२ व्या वर्षीही अभिनेत्रीच्या किलर लूकने चाहत्यांना वेड लावले आहे.
श्वेता केवळ तिच्या कामामुळेच नाही तर तिच्या फिटनेसमुळेही चर्चेत असते.
श्वेता तिवारी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि तिचे फोटो शेअर करत असते. तिचे फोटो पाहून चाहते घायाळ होतात.
सध्या श्वेता तिवारीच्या तिसऱ्या लग्नाची सध्या चर्चा होताना दिसते आहे.
श्वेता तिवारी खऱ्या आयुष्यात लग्न केलेलं नाही तर डॅड की दुल्हन मालिकेत ती वरुण बडोलासोबत लग्नगाठ बांधणार आहे.
तिचा मालिकेतील लग्नाचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
1998 मध्ये श्वेताने पहिले लग्न केले होते. तिच्या पतीचे नाव राजा चौधरी होते. श्वेताने पलक तिवारी नामक मुलीला जन्म दिला. तथापि, राजा चौधरीसोबतचे तिचे लग्न फार काळ टिकले नाही आणि 14 वर्षांनी त्यांचा घटस्फोट झाला.
श्वेताने पलक तिवारी नामक मुलीला जन्म दिला. तथापि, राजा चौधरीसोबतचे तिचे लग्न फार काळ टिकले नाही आणि 14 वर्षांनी त्यांचा घटस्फोट झाला.
त्यानंतर तिने अभिनव कोहलीसोबत लग्न केले, त्यानंतर तिने बाळाला जन्म दिला आणि त्यानंतर त्यांचा घटस्फोट झाला.
वयाच्या 42 व्या वर्षीही श्वेता खूप हॉट आणि फिट दिसते आणि तरुण अभिनेत्रींनाही मागे टाकते.