सिद्धार्थच्या प्रेमात बुडाली होती शहनाज गिल, 'सिडनाज' नावाने प्रसिद्ध होती दोघांची जोडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2021 12:57 IST2021-09-02T12:38:08+5:302021-09-02T12:57:17+5:30
'बालिका वधू' मालिकेमुळे प्रकाशझोतात आलेला सिद्धार्थ शुक्लाचे हार्टअकटॅकने निधन झालंय. सिध्दार्थच्या अकाली एक्झिटने सारेच हळहळले आहेत. सिद्धार्थच्या निधन झाल्याची बातमी आली अन् अवघी इंडस्ट्रीच शोकसागरात बुडाली आहे.

'बालिका वधू' सारख्या काही हिट मालिका आणि 'बिग बॉस १३'चा सिद्धार्थ विजेताही होता.
टीव्ही इंडस्ट्री गाजवल्यानंतर बॉलिवूड सिनेमा 'हंपटी शर्मा की दुल्हनिया' आणि वेबसिरीज 'ब्रोकन बट ब्यूटीफल' हिट ठरली होती.
सिद्धार्थची शहनाज गिलसोबत खूप चांगली केमिस्ट्री रंगल्याचे पाहायला मिळाले.
दोघांची मैत्री 'बिग बॉस १३' सिझनमध्येच झाली होती.
शहनाज तर सिद्धार्थच्या प्रेमात आकंत बुडाली होती.
बिग बॉस शो संपल्यानंतर या दोघांना एकत्र अनेक प्रोजेक्ट ऑफर करण्यात आले होते.
सिदनाज अजूनही एक गोष्ट आहे आणि हे नातं शोचं नाही तर ते खऱ्या आयुष्यातदेखील आहे.
असे दिलेल्या एका मुलाखतीत शहनाजने दोघांविषयी सांगितले होते.
सोशल मीडियावरही दोघांच्या जोडीला प्रचंड पसंती मिळाली.
दोघांचाही सोशल मीडियावर प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे.
दोघांच्या लग्नाच्याही बातम्या प्रचंड रंगल्या होत्या.