चुरा लिया है तुमने जो दिल को… मराठमोळ्या शर्वरी वाघचं बोल्ड फोटोशूट, पाहा Photos

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 13:44 IST2025-01-07T13:26:26+5:302025-01-07T13:44:04+5:30

बॉलिवूड अभिनेत्री शर्वरी वाघने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे.

सध्या शर्वरीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. फोटोंमध्ये अभिनेत्री बोल्ड आणि क्लासी दिसत आहे.

शर्वरीने या लुकसह सिंपल मिनिमम मेकअप ठेवला असून मॅट लिपस्टिक लावली आहे. तर केस मोकळे सोडले आहेत.

या फोटोतील तिचं स्मित हास्य अक्षरश: वेड लावत आहे.

शर्वरीच्या ग्लॅमरस फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते. तिच्या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंट करत प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

शर्वरी सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नवीन प्रोजेक्टबरोबरच वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्सही ती चाहत्यांना देत असते.

मराठी कुटुंबात जन्मलेली शर्वरी वाघ मुंज्या चित्रपटामुळे प्रकाशझोतात आली. तिने बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटात लीड रोलमध्ये आपल्या अभिनयाचं नाणं खणखणीत वाजवलं आहे.

शर्वरी वाघ मराठी मुलगी असून ती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी नात आहे. 1995 ते 1999 या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेल्या मनोहर जोशी यांची शर्वरी नात आहे.

शर्वरीच्या लव्हलाईफबद्दल बोलायचं झालं तर ती विकीचा भाऊ सनी कौशल याला डेट करत आहे. दोघांनी कबीर खानच्या 'द फॉरगॉटन आर्मी: आझादी' या वेब सीरिजमध्ये एकत्र काम केले होते. तेव्हापासून या दोघांच्या अफेअरची चर्चा आहे, पण अद्याप या दोघांनी मीडियासमोर जाहीरपणे बोलणं टाळलं आहे.

शर्वरी लवकरच अल्फा या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट विशेष ठरणार आहे कारण यामध्ये पहिल्यांदाच दोन महिला एजंट्सची प्रमुख पात्रे असणार आहेत. यामध्ये शर्वरीसोबतच अभिनेत्री आलिया भटदेखील आहे.