'सौभाग्यवती भव 2' पासून 'जुनूनियत' पर्यंत 'हे' टीव्ही शो घेणार प्रेक्षकांचा निरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2023 15:27 IST2023-11-09T15:13:16+5:302023-11-09T15:27:54+5:30
मालिका असो वा एखादा कार्यक्रम एक ना एक दिवस प्रेक्षकांचा निरोप घेणार हे नक्की असते.

'मीत' या टीव्ही मालिकेची कथा प्रेक्षकांना अजिबात आवडली नाही. या कारणास्तव निर्मात्यांनी ती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. शोच्या शेवटच्या एपिसोडचे शूटिंगही झाले आहे.
'बातें कुछ अनकही सी' या मालिकेला टीआरपी मिळत नाही. त्यामुळे निर्मात्यांनी ती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या शोमध्ये मोहित मलिक आणि सायली मुख्य भूमिकेत आहेत.
'सौभाग्यवती भव 2' ही मालिका प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करू शकलेली नाही. त्यामुळेच हा शो लवकरच बंद होणार आहे.
'दिल दिया गल्लां' मालिकेलाही प्रेक्षकांचे प्रेम मिळालेले नाही. आतापर्यंत हा शो टीआरपीच्या यादीत स्थान मिळवू शकला नाही. वृत्तानुसार, निर्माते आता ती बंद करण्याच्या तयारीत आहेत.
टीव्ही मालिका 'पांड्या स्टोर'लाही जास्त टीआरपी मिळत नाहीये. रिपोर्ट्सनुसार हा शो लवकरच बंद होणार आहे.
'ये हैं चाहते' मालिकेमध्ये 20 वर्षांचा लीप घेतला होता. पण, या मालिकेची कथा प्रेक्षकांना आवडली नाही, त्यामुळेच तिचा टीआरपी खूपच कमी झाला आहे.
'कह दूं तुम्हें' ही मालिका काही काळापूर्वी सुरू झाली आहे. मात्र खराब टीआरपीमुळे निर्माते ती आता बंद करण्याचा निर्णय घेत आहेत.
'जुनूनियत' या मालिकेला सुरुवातीला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. पण आता टीआरपी कमी येत आहे. त्यामुळेच निर्माते आता ती बंद करण्याची तयारी करत आहेत.