पत्नी मान्यता अन् दोन जुळ्या मुलांसह आलिशान घरात राहतो संजूबाबा; पाहा संजय दत्तच्या घराचे Inside photos
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2022 13:55 IST2022-02-08T13:49:58+5:302022-02-08T13:55:27+5:30
Sanjay dutt: मुंबईप्रमाणेच संजयचं दुबईतदेखील घर आहे. ज्यावेळी मान्यता दुबईमध्ये असते त्यावेळी ती याच घरात राहते. या घराचेही फोटो तिने शेअर केले आहेत.

संजू बाबा या नावाने संपूर्ण बॉलिवूडमध्ये फेमस असलेला अभिनेता म्हणजे संजय दत्ता. प्रोफेशनल लाइफसोबत पर्सनल लाइफमुळे संजय अनेकदा चर्चेत राहिला आहे.
संजय दत्तप्रमाणेच त्याची पत्नी मान्यता दत्तही अनेकदा नेटकऱ्यांमध्ये चर्चेत असते. मान्यता सोशल मीडियावर कमालीची सक्रीय असून ती तिच्या घराचे फोटो शेअर करत असते.
त्यामुळेच संजय दत्त आणि मान्यता यांचं आलिशान घर आतून कसं दिसतं ते पाहुयात.
संजय आणि मान्यता यांनी ७ फेब्रुवारी २००८ मध्ये लग्न केलं. जवळपास १४ वर्ष या दोघांच्या लग्नाला झाली असून त्यांना दोन जुळी मुलं आहेत.
लग्नानंतर मान्यताने वांद्र्यातील पाली हिल येथील संजय दत्तच्या घरात गृहप्रवेश केला. तेव्हापासून या घरातील प्रत्येक कोपरा अन् कोपरा मान्यताने सुरेखरित्या सजवला आहे.
संजय आणि मान्यताचं घर प्रचंड आलिशान आणि प्रशस्त आहे. या घरात अनेक पेटिंग्स लावण्यात आले आहेत.
घरातील प्रत्येक गोष्ट आर्टशी संबंधित आहे.
मान्यता अनेकदा घरामध्येच तिचं फोटोशूट करत असते.
मुंबईप्रमाणेच संजयचं दुबईतदेखील घर आहे. ज्यावेळी मान्यता दुबईमध्ये असते त्यावेळी ती याच घरात राहते. या घराचेही फोटो तिने शेअर केले आहेत.
ड्राईंग रुमपासून ते किचनपर्यंत प्रत्येक गोष्ट खास करण्यावर मान्यताने भर दिला आहे.